मरकजच्या लोकांना गोळ्या घालून ठार मारलं पाहिजे, राज ठाकरे संतापले

दिल्लीमधील निझामुद्दीन येथे झालेल्या तबिलगी मरकजच्या कार्यक्रमावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सडकून टीका केली आहे.

मरकजच्या लोकांना गोळ्या घालून ठार मारलं पाहिजे, राज ठाकरे संतापले
SHARES

दिल्लीमधील निझामुद्दीन येथे झालेल्या तबिलगी मरकजच्या कार्यक्रमावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सडकून टीका केली आहे. रुग्णालयात मरकजच्या सदस्यांकडून डॉक्टरांना दिल्या जाणाऱ्या असभ्य वागणुकीवर संताप व्यक्त करताना मरकजच्या लोकांना गोळ्या घालून ठार मारलं पाहिजे, अशी संतप्त प्रतिक्रिया राज यांनी व्यक्त केली.

देशव्यापी लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी शनिवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, मुसलमानांमधील काही अवलादी आहेत त्यांना आताच ठेचलं पाहिजे. मरकजच्या लोकांना गोळ्या घालून ठार मारलं पाहिजे. यांच्यासाठी वेगळा विभाग उभा करावा. त्यांचे वैद्यकीय उपचार बंद करायला हवे. नोटांना थुंका लावत आहेत. भाज्यांवर थुंकत आहेत. नर्सेसमोर नग्न फिरत आहेत. या लोकांना फोडून काढतानाचे व्हिडिओही व्हायरल केले पाहिजेत. मुस्लिम समाजातील काही लोक संशयाचं वातावरण निर्माण करत आहेत. निवडणुकीच्यावेळी कुठे मतदान करायचे याचं फर्मान सोडणारे मौलवी आता प्रबोधन करण्यासाठी पुढे का येत नाहीत? असा सवालही त्यांनी यावेळी केला.

या संकटात काळात पोलीस, नर्स आणि डॉक्टर जीव धोक्यात घालून अहोरात्र काम करत आहेत. त्यांच्यावर हात उगारलाच कसा जाऊ शकतो? पोलीस आणि डॉक्टरांसह कोणत्याही कर्मचाऱ्यांवर हल्ला करणाऱ्यांना फोडून काढा, अशी संतप्त प्रतिक्रियाही राज यांनी व्यक्त केली. आता पोलिसांचे दोष काढण्याची वेळ नाही. त्यांचं खच्चीकरण करण्याची ही वेळ नाही. उलट पोलिसांना सहकार्य केलं पाहिजे. तसंच कोरोनाचा फायदा घेऊन अन्नधान्याचा काळाबाज करणाऱ्यांनाही फोडून काढलं पाहिजे, असंही यावेळी राज म्हणाले.  

दंगलीतही इतकी शांतता नव्हती

असा प्रसंग आजपर्यंत कोणाच्या आयुष्यात आला नव्हता. असं कधी बघितलं नव्हतं. हे केवळ आपल्या देशावरचं संकट नाही, तर जगावर हे संकट आलं आहे . १९९२-९३ मध्ये झालेल्या दंगलीच्या काळातही अशी शांतता पाहिली नव्हती, असंही यावेळी राज यांनी म्हटलं.  राज म्हणाले की, मोठं आर्थिक संकट ओढवण्याची शक्यता आहे. अनेकांच्या नोकऱ्या जाऊ शकता. रोजगार धंदे बुडू शकतात. त्यामुळे लॉकडाऊनचे नियम पाळा. लॉकडाऊन गांभीर्याने घ्या.  काही लोक नियम पाळत नसल्याने लॉकडाऊन वाढवण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे आणखी मोठ्या संकटाचा सामना करावा लागू शकतो.  

मोदींवर टीका

 मी त्या दिवशी पंतप्रधानांचं भाषण ऐकलं. पंतप्रधानांनी दिवे लावण्यास सांगितलं आहे. लोक काळोख करतीलही, नाही तरी घरात बसून काय करायचं आहे. श्रद्धा किंवा अंधश्रद्धेचा विषय असेल, पण त्याच्याने काही होणार असेल तर त्याने परिणाम होऊ देत. पण नुसतं दिवे घालवून, मेणबत्त्या पेटवून, टॉर्च लावून याऐवजी पंतप्रधानांच्या भाषणात आशेचा किरण जरी दिसला असता तरी लोकांना समाधान वाटलं असतं, अशा शब्दात राज यांनी मोदींवर टीका केली. हेही वाचा

CISF च्या 11 जवानांना कोरोनाची लागन

मुंबई पोलिस दलातील पोलिस उपायुक्ताची कोरोनाची टेस्ट निगेटिव्ह

 संबंधित विषय