CISF च्या 11 जवानांना कोरोनाची लागन


CISF च्या 11 जवानांना कोरोनाची लागन
SHARES
मुंबईत दिवसेंदिवस कोरोनाचे नवे रुग्ण आता समोर येऊ लागले आहेत. धक्कादायकबाब म्हणजे या संसर्ग रोगाची लाग आता नागरिकांच्या सुरक्षेसाठी तैनात  असलेल्या कर्मचाऱ्यांना होत आहे. मुंबईत तीन पोलिसांना कोरोनाची लागन झाल्याचे वृत्त ताजे असतानाच, मुंबई विमानतळ (Mumbai Airport) येथे काम करणाऱ्या 11 CISF जवानांना COVID-19 बाधा झाल्याचे पुढे आले आहे. एक दिवसांपूर्वीच यातील पाच जणांची कोरोनाची टेस्ट पाँझिटिव्ह आली होती. त्यानंतर हे 6 नवे रुग्ण तपासणीत समोर आल्याचे CISF चे प्रवक्ते शरद देवारे यांनी सांगितले.

 पनवेल परिसरात राहणारे पाच जवान हे मुंबई विमानतळावर गस्तीला आहेत. दोन दिवसांपूर्वी अचानक त्यांच्या घशात खवखव वाढली. अन्न खाताना घशात दुखू लागल्याने त्यांनी तपासणी केली असता. त्यांना कोरोनाची लागन झाल्याचे निश्पन्न झाले. त्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या सहा जवानांची कोरोना व्हायरस चाचणी करण्यात आली. या चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आला.


नवी मुंबई शहरात कोरोना व्हायरस बाधित रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. ही संख्या पनवेल, वाशी, कोपरखैरणे आणि नेरुळ येथील असल्याचेही पुढे आले आहे. दरम्यान, पनवेलमध्ये ज्या परीसरातील इमारतीत हे पाच सीआयएसएफ रुग्ण आढळले आहेत ती इमारत नवी मुंबई महापालिकेने बंद केली आहे. या इमारतीत राहणाऱ्या इतरही काही रहिवाशांची कोरोना व्हायरस चाचणी केली जाण्याची शक्यता आहे. या पाच जवानांसह पनवेलमधील कोरोना व्हायरस बाधित रुग्णांची संख्या जवळपास आठवर पोहोचली आहे.

आरोग्य विभागाने दुसऱ्या सहा जणांची केलेल्या तपासणीत त्यांना ही कोरोनाची लागण झाल्याचे शुक्रवारी पुढे आले. या सर्वांची प्रकृती स्थिर असून त्या 11 जवानांवर उपचार सुरू आहेत.


वाशी येथे राहात असलेल्या एका विदेशी नागरिकास कोरोना व्हायरस झाला होता. हा नागरिक फिलिपीन्स येथून आला होता. या नागरिकाच्या संपर्कात आलेल्या काही नागरिकांनाही कोरोना व्हायरसचा संसर्ग झाल्याचे पुढे येत आहे. दरम्यान, मुंबई शहरातील वरळी पोलिस कँम्प मधील दोन पोलिस शिपायांना कोरोना व्हायरस संसर्ग झाल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे येथील परिसरही मुंबई महापालिकेने सील केला आहे.
Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा