मुंबई पोलिस दलातील पोलिस उपायुक्ताची कोरोनाची टेस्ट निगेटिव्ह


मुंबई पोलिस दलातील पोलिस उपायुक्ताची कोरोनाची टेस्ट निगेटिव्ह
SHARES
महाराष्ट्रात कोरोनाचा कहर वाढतच असलेला पाहायला मिळतोय. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रात्रंदिवस काम करत असलेल्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची सुद्धा  कोरोनातून सुटका होत नसल्याचे दिसून येतंय. अनेक डॉक्टर, नर्स आणि पोलिसांना कोरोनाची बाधा झालेली असतानाच आता मुंबई पोलीस दलातील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला सुद्धा कोरोनाची लागण झाल्याचा संशय निर्माण झालाय. या वरिष्ठ अधिकाऱ्याच्यात कोरोनाची लक्षण दिसून आल्याने त्याला मुंबईतल्या लीलावती रुग्णालयात दाखल केले होते. माञ त्याची कोरोनाची टेस्ट निगेटिव्ह आली आहे.आतापर्यंत एकूण दोन पोलीस अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं पुढे आले आहे. 

     कोरोनाची लक्षण दिसून आल्याने या पोलीस उपायुक्त पदावरील अधिकाऱ्याला मुंबईतल्या लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचे कार्यालय पूर्णपणे क्वारंटईन करण्यात आले. या अधिकाऱ्यांच्या गाडीचा ड्रायव्हर आणि ऑर्डरली यांना सुद्धा क्वारंटईन करण्यात आलंय.माञ त्याच्या कोरोनाच्या तपासणीत त्याची टेस्ट निगेटिव्ह आल्याने वरिष्ठांनी मोकळा श्वास घेतला. तरी खबरदारी म्हणून त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीचा शोध घेऊन क्वारंटईन करण्याचे काम सुरू आहे.

काही दिवसांपूर्वीच रेल्वेतील आणि वरळी पोलिस कँम्प परिसरात रहायला असलेल्या शिपायामध्ये कोरोनाची लागन झाल्याचे पुढे आले होते. त्यानंतरची ही दुसरी घटना आहे. त्या अनुशंगाने आता वरिष्ठ पोलिस  अधिकाऱ्यांनी आप आपल्या विभागातील पोलिसांना खबरदारी घेण्यास सांगितलेली आहे.
Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा