coronavirus : मुंबईत कोरोनाच्या रुग्णात वाढ, राज्यातील कोरोनाची संख्या ४९०

कोरोनाव्हायरचे महाराष्ट्रात आज दिवसअखेर ४९० रुग्ण झाले आहेत. गेल्या २४ तासांत ६७ नवे रुग्ण सापडले. त्यातले सर्वाधिक मुंबईत सापडले. त्यानंतर पुण्यात कोरोनाग्रस्तांमध्ये वाढ झाली आहे. लॉकडाऊन असतानाही मुंबईत रुग्णांचा आकडा वाढत आहे. त्यामुळे चिंता अधिक वाढली आहे.  

दिवसभरात मुंबईत ४३ कोरोनाग्रस्त दाखल झाले. त्यामुळे मुंबईतल्या कोरोनाबाधितांची संख्या २७८ झाली आहे. पुण्यात आज ९ रुग्ण सापडले तर नवी मुंबईत ८ कोरोनाग्रस्त सापडले. राज्यात कोरोनामुळे आतापर्यंत २६ मृत्यू झाले आहेत. त्यापैकी मुंबईतील १९ जणांचा समावेश आहे.

दिवसभरातील रुग्ण

मुंबई ४३

पुणे ९

नवी मुंबई ८

नगर ३

पालघर १

वाशिम १

कल्याण डोंबिवली १

रत्नागिरी १

कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून देशभरात १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन आहे. मात्र, नागरिकांची अडचण होऊ नये म्हणून अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात आल्या. यामध्ये बेस्ट बसचीही सेवा सुरू आहे. मात्र, आता बेस्टमधील कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. कोरोनाची लागण झालेला पहिला कर्मचारी असल्याची माहिती मिळत आहे.

बेस्टमध्ये कोरोना शिरल्यानं आता चिंता व्यक्त केली जात असून सफाई कामगारांनंतर आता बेस्टमधील कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होण्यास सुरुवात झाली आहे. वडाळा डेपोमध्ये फोरमन म्हणून हा कर्मचारी काम करत होता. या कर्मचाऱ्याला एस. आर. व्ही. रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

वरळी कोळीवाड्यातील तीन रहिवाशांची कोरोनाव्हायरसची पॉझिटिव्ह आली. त्यानंतर पालिकेनं त्यांच्या संपर्कात आलेल्या १५० लोकांना शोधून काढले आहे. या सर्व १५० जणांना पोद्दार रुग्णालयात क्वारंटाईन म्हणजेच वेगळं ठेवण्यात आलं आहे. वरळी कोळीवाड्यातील ३ पॉझिटिव्ह रुग्णांपैकी एक कपल जोडपे आहे. त्यामुळे त्यांना जास्त धोका असल्याचं बोललं जातंय.

राज्यात गुरुवारी ८८ नवीन कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा आता ४२३ वर पोहोचला आहे. देशातील सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्रात आहेत. त्यातील ५४ रुग्ण मुंबईत असून ९ जण अहमदनगरचे, ११ पुण्यातले आहेत. याशिवाय ९ जण मुंबईच्या आजूबाजूच्या क्षेत्रातील आहेत. नवी मुंबईत ९, औरंगाबादचे २, सातारा, उस्मानाबाद आणि बुलढाण्याचा प्रत्येकी १ रुग्ण आहे. राज्यात आतापर्यंत २६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे तर ५० जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून त्यांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे.


हेही वाचा

CISF च्या 11 जवानांना कोरोनाची लागन

मुंबई पोलिस दलातील पोलिस उपायुक्ताची कोरोनाची टेस्ट निगेटिव्ह

पुढील बातमी
इतर बातम्या