भांडुपमध्ये ५ जुलैपर्यंत कडक लाॅकडाऊन

पूर्व उपनगरातील भांडुपमध्ये कोरोना रुग्णांची संख्या रोज वाढतच आहे. त्यामुळे येथील लाॅकडाऊन  ५ जुलैपर्यंत वाढविण्यात आला आहे. १९ जूनपासून या भागात कडक लाॅकडाऊनची अंमलबजावणी करण्यात आली.

मुंबईत रुग्णसंख्येत भांडुप चौथ्या क्रमांकावर आहे. भांडूपमध्ये रोज १०० पेक्षा अधिक रुग्ण आढळत आहेत. १९ जूनपासून या ठिकाणी लाॅकडाऊन लागू करण्यात आला. २६ जूनपर्यंत केवळ अत्यावश्यक दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली होती. मात्र तरीही रुग्णसंख्या वाढतच आहे. त्यामुळे येथील लाॅकडाऊन ५ जुलैपर्यंत वाढवण्यात आला आहे. या कालावधीत भाजीविक्री, फळविक्री, फेरीवाले, अत्यावश्यक सेवा वगळून सर्व दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत. 

 मुंबईतील रुग्णवाढीचा दर १.७१ टक्के आहे. मात्र भांडुपमधील रुग्णवाढीचा दर ३ टक्के आहे. २४ जूनला भांडूपमध्ये १०३, २५ जूनला १२१, २६ जूनला ११८ नवीन रुग्ण सापडले. १९ जूनला येथील रुग्णांची संख्या ३,३९९ होती. ही रुग्णसंख्या वाढून २८ जूनला ४११९ वर गेली आहे. भांडूपमधील रुग्णसंख्या दुपटीचा कालावधी २६ दिवस आहे.


हेही वाचा -

शिवसेना भवनातील ३ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

पश्चिम रेल्वेवर ४० फेऱ्या वाढवण्याचा निर्णय, अनेकांना दिलासा



पुढील बातमी
इतर बातम्या