Coronavirus update: राज्यात २ हजार कोरोनाबाधित रुग्ण झाले बरे!

राज्यात शनिवारी १२१ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आलं असून आतापर्यंत राज्यभरात २००० कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. शनिवारी कोरोनाबाधित ७९० नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण रुग्णसंख्या १२ हजार २९६ झाली आहे. तर एकूण ९७७५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

दीड लाखांहून अधिक क्वारंटाईनमध्ये

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १ लाख ६१ हजार ९२ नमुन्यांपैकी १ लाख ४८ हजार २४८ जणांचे प्रयोगशाळा नमुने निगेटिव्ह आले आहेत, तर १२ हजार २९६ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात १ लाख ७४ हजार ९३३ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून १२ हजार ६२३ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

हेही वाचा - डॉक्टरच आहेत धारावीतील COVID-19 चाचणीचे खरे शिलेदार!

मुंबईत २ हजार अतिरिक्त खाटा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये २ हजार अतिरिक्त खाटांची उपलब्धता करण्यात येत असून दाट लोकवस्तीच्या ठिकाणी राहणाऱ्या आणि ज्यांना मधुमेह, रक्तदाब अशा अन्य आजारांची लक्षणे (कोमॉर्बीड) असलेल्या ज्येष्ठ नागरिकांचे सर्वांत आधी सर्वेक्षण करून त्यांना आवश्यकत भासल्यास संस्थात्मक क्वारंटाईन करावे आणि त्यांच्यावर वेळेवर उपचार होईल, अशी नवी कार्यपद्धती ठरविण्यात आल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं.

५२१ जणांचा मृत्यू

शनिवारी राज्यात ३६ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर राज्यात आतापर्यंत ५२१ कोरोनाबाधितांचा मृत्यू झालेला आहे. 

  • कोरोनामुळे होणारा मृत्यूदर कमी होऊन तो ३.५ टक्के एवढा झाला आहे.
  • राज्याचा कोरोना रुग्ण दुपटीचा वेग हा देशाच्या सरासरी वेगा पेक्षा जास्त आहे.
  • राज्यात ४५ प्रयोगशाळा कार्यरत. त्यात २५ शासकीय २० खासगी प्रयोगशाळा आहे. दररोज ७ हजारांहून अधिक चाचण्यांची क्षमता
  • राज्यात ७३३ कंटेनमेंट झोन. १० हजार सर्वेक्षण पथके कार्यरत तर ४३ लाख लोकांचे सर्वेक्षण पूर्ण
  • लवकर निदानासाठी पोर्टेबल पल्स ऑक्सिमीटर चाचणी उपयुक्त. याद्वारे रुग्णाच्या शरीरातील ऑक्सिजनच्या प्रमाणावरून कोरोनाचा प्राथमिक अंदाज घेणे शक्य.
  • राज्यात केंद्राच्या निकषानुसार जिल्ह्याचे वर्गीकरण. केंद्र शासनच्या सूचनेनुसार राज्यातील ३६ जिल्ह्यांपैकी १४ जिल्हे रेड झोन मध्ये, १६ ऑरेंज आणि ६ जिल्हे ग्रीन झोन मध्ये आहेत.

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या ८४४ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण १० हजार ५१३ सर्वेक्षण पथकांनी  काम केलं असून त्यांनी ४४.४० लाख  लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेलं आहे

हेही वाचा - आता महाराष्ट्रातील सगळ्यांनाच मिळणार मोफत जन आरोग्य योजनेचा लाभ
पुढील बातमी
इतर बातम्या