Advertisement

डॉक्टरच आहेत धारावीतील COVID-19 चाचणीचे खरे शिलेदार!

कोरोनाचा धोका अधिक पसरू नये म्हणून डॉक्टरांच्या अनेक पथकांनी झोपडपट्टीतल्या सर्व भागात तपासणी केली.

SHARES

धारावी ही आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी आहे. जगातील सर्वाधिक दाटीवाटीची लोकसंख्या असलेलं ठिकाण म्हणजे धारावी. या परिसरात १० लाख लोक राहतात. धारावीतील गर्दी आणि लहान-लहान घरं यामुळे इथल्या रहिवाशांना सोशल डिस्टंसिंग पाळणं कठिण आहे. म्हणूनच इथल्या रहिवाशांना अधिक धोका आहे.

कोरोनाचा धोका अधिक पसरू नये म्हणून डॉक्टरांच्या अनेक पथकांनी झोपडपट्टीतल्या सर्व भागात तपासणी केली. आघाडीवर असलेले डॉक्टर आपला जीव धोक्यात घालत आहेत हे सांगायला नको. इथल्या डॉक्टरांनी ३७ हजार पेक्षा जास्त रहिवाशांची स्क्रिनिंग आणि शेकडो चाचण्या घेतल्या आहेत.

धारावीत कोरोनव्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी डॉक्टर मुंबई पोलिस आणि बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) काम करत आहेत. व्हिडिओमध्ये, अशा हॉटस्पॉटमध्ये राहणाऱ्या लोकांशी डॉक्टर संवाद साधत आहेत. त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत आहेत. आता रहिवाशांनी तपासणी करुन डॉक्टरांना सहकार्य करण्यास सुरुवात केली आहे.

कोरोनाव्हायरसच्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्रात अधिक रुग्ण आढळत आहेत. त्यात मुंबईचा पहिला नंबर लागतो. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार महाराष्ट्रात COVID 19 रुग्णांची संख्या वाढली आहे. महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांना आकडा ८ हजार ५९० च्या घरात गेला आहे. त्यापैकी मुंबईत ५ हजार ७७६ रुग्ण आहेत.  २७ एप्रिलपर्यंत धारावीतील COVID 19 रुग्णांची संख्या २८८ वर पोहोचली आहे.




Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा