coronavirus update: मुंबईत कोरोनाचा संशयीत रुग्ण? हिंदुजा रुग्णालयाचा नकार

कोरोना व्हायरचा (coronavirus) संसर्ग जसजसा वाढू लागलाय, तसतशी सर्वसामान्यांमधील चिंताही वाढू लागली आहे. देशात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झालेली असताना मुंबईतही कोरोनाचा एक संशयीत रुग्ण (coronavirus suspected patient) आढळून आल्याचं म्हटलं जात होतं. परंतु हिंदुजा रुग्णालयाने (hinduja hospital) असा कुठलाही रुग्ण दाखल नसल्याचा खुलासा केला. या सगळ्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील नागरिकांना घाबरून न जाता कोरोना व्हायरसचा (COVID-19 outbreak) फैलाव होऊ नये म्हणून खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे.  

हेही वाचा- होळी खेळा पण.., कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान

शुक्रवार ६ मार्च रोजी मुंबईत कोरोना व्हायरसची (coronavirus) लागण झालेला एक संशयीत रुग्ण आढळून माहीम येथील हिंदुजा रुग्णालयात दाखल झाल्याचं म्हटलं जात होतं. हा संशयीत रुग्ण नुकताच दुबईहून मुंबईत आला होता. सध्या दुबईत कोरोनाने आपले हातपाय चांगलेच पसरले आहेत. तज्ज्ञ डाॅक्टरांच्या देखरेखेखाली या रुग्णावर उपचार सुरू असल्याचं म्हटलं जात होतं.

परंतु सध्या रुग्णालयात कोरोना व्हायरसची  (COVID-19) लागण झालेला एकही संशयीत रुग्ण दाखल नसल्याचं रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केलं. करोना व्हायरसविरूद्ध खबरदारी म्हणून रुग्णालय सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सर्व आवश्यक काळजी घेत असल्याचंही रुग्णालयाने सांगितलं. 

दरम्यान, करोना व्हायरसचा (coronavirus) शहरात फैलाव होऊ नये तसंच संशयीत रुग्णांवर त्वरीत उपचार करता यावेत यासाठी मुंबई महापालिकेने युद्धपातळीवर उपाययोजना केल्या आहेत. त्यानुसार भायखळ्यातील कस्तुरबा रुग्णालयात (kasturba hospital) कोरोना व्हायरस टेस्टिंग लॅब सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत करोना व्हायरसच्या संशयीत रुग्णांचं रक्त तपासणीसाठी पुण्यातील नॅशनल इंन्स्टिट्यू आॅफ व्हायराॅलाॅजीत (NIV) पाठवण्यात येत होतं. पण या लॅबमुळे मुंबईतच रक्तचाचणी होऊन रुग्णावर त्वरीत उपचार करणं शक्य होणार आहे.

हेही वाचा- मुंबईत कोरोना व्हायरसचा धोका? 'अशी' घ्या खबरदारी 

मुंबई महापालिका (BMC) अखत्यारीतील सर्व रुग्णालयांना दक्षतेचे आदेश देण्यात आले आहेत. घाटकोपरमधील राजावाडी रुग्णालय, वांद्र्यातील भाभा रुग्णालय, जोगेश्वरीतील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्राॅमा केअर रुग्णालयात १०० खाटा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. सोबतच प्रत्येक वाॅर्डात ६ सदस्यांच्या २४ हेल्थ टीम कोरोना व्हायरस संशयीत रुग्णांवर नजर ठेवत आहे. २ टीम आंतरराष्ट्रीय विमानतळावरील संशयीत रुग्णांवर नजर ठेवत आहे. अंधेरीतील सेव्हन हिल्स रुग्णालयात कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी विशेष व्यवस्था करण्यासाठी महापालिका प्रयत्न करत आहे.  

पुढील बातमी
इतर बातम्या