अनधिकृत नर्सिंग होम, हॉस्पिटलवर कारवाईची मागणी

मुंबई महापालिकेच्या हद्दीतील अनधिकृत नर्सिंग होम, हॉस्पिटलवर कारवाई  न करणाऱ्या  अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी आ.देवेंद्र भुयार यांनी केली आहे.

 मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत अनेक बेकायदेशीर व अनधिकृत नर्सिंग होम आणि हॉस्पिटल असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते सुनील शिरिषकर यांनी पालिका आयुक्तांकडे अनेकदा निवेदनाद्वारा केली होती. परंतु याची दखल न घेतल्यामुळे हा विषय आ. देवेंद्र भुयार या अधिवेशनात लक्षवेधीच्या माध्यमातून मांडणार होते. पण अधिवेशन लवकर संपवण्यात आल्याने त्यांनी पालिका आयुक्तांना पत्र लिहून एम पूर्व विभागातील सहाय्यक आयुक्त , मुख्य वैद्यकीय अधिकारी , मुख्य अग्निशामक अधिकारी यांच्या निलंबनाची मागणी केली आहे. हे अधिकारी जनतेच्या आरोग्याशी खेळत असून अनधिकृत नर्सिंग होम, हॉस्पिटल चालू राहणे ही चिंताजनक व गंभीर बाब आहे असं आमदार भुयार यांनी म्हटलं आहे.

 शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबनास प्रतिबंध अधिनियम 2005 अर्थात दप्तर दिरंगाई कायद्या अंतर्गत कलम 8 (2) , कलम 10 (1) , कलम 10 (2) आणि कलम 10 (3) प्रमाणे संबंधित अधिकारी यांचे निलंबन करावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुनील शिरिषकर यांनी केली आहे .


हेही वाचा -

ICICI बँक आता तुमच्या घरी

कोरोनामुळे 10 हजार कर्मचाऱ्यांना पाठवले बिनपगारी रजेवर


पुढील बातमी
इतर बातम्या