Exclusive : गोरेगाव ते दहिसर भागात COVID 19 रुग्णांसाठी डायलिसिसची सुविधा नाही

दहीसर ते गोरेगाव अंतर्गत येणारा भाग कोरोनाचा नवीन हॉटस्पॉट म्हणून ठरत आहे. या भागात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ दिसून येत आहे. असे बरेच रुग्ण आहेत ज्यांना मूत्रपिंडाचा आजार देखील आहे. या रुग्णांना कोरोनाच्या उपचारांसह डायलिसिसची सुविधा देखील आवश्यक आहे. परंतु गोरेगाव ते दहिसर दरम्यानच्या बीएमसी कोविड रुग्णालयात डायलिसिसची सुविधा उपलब्ध नाही.

"गोरेगाव ते दहिसर मध्ये पालिकेच्या COVID रुग्णालयांमध्ये डायलिसिस सुविधा उपलब्ध नाही" असं सांगत भाजपचे आमदार योगेश सागर यांनी पालिकेकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे. हे एक मोठं प्रशासकीय अपयश आहे. कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयातून नायर रूग्णालयात जर रुग्णाला डायलिसिससाठी पाठवलं जातं. मग पालिकेच्या ८० हजार करोड रुपयांच्या FD चा उपयोग काय? ”, असा प्रश्न योगेश सागर यांनी उपस्थित केला आहे.


कोरोनाव्हायरस हवेतून पसरू शकतो, शास्त्रज्ञांचा दावा


दरम्यान, मुंबईतील मालाड, कांदिवली, बोरिवली आणि दहिसर भागात कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. हे लक्षात घेता मनपा आणि पोलिस प्रशासनानं बाधित क्षेत्रात लॉकडाऊन संबंधित नियम कठोर केले आहेत. लोकांना आवश्यकतेनुसारच घराबाहेर जाण्यास सांगितलं आहे. आवश्यक सामान पुरवणाऱ्या दुकानांनाच उघडण्याची परवानगी आहे. रुग्णांच्या संख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी पालिकेनं या भागात धारावी पॅटर्नही राबविला आहे. यासह वेगवान चाचण्याही केल्या जात असून त्या ठिकाणी वैद्यकीय शिबिरेही घेण्यात येत आहेत.


हेही वाचा

कल्याण-डोंबिवलीतील मोबाइल क्रमांकासह 'ही' आहे अ‍ॅम्बुलन्सची यादी

कोरोनवर मात करण्यासाठी टाटा ग्रुपची महापालिकेला पुन्हा आर्थिक मदत

पुढील बातमी
इतर बातम्या