Advertisement

Mira-Bhayandar: मिरा-भाईंदरमध्ये कोरोनाने तोडला रेकाॅर्ड, दिवसभरात ‘इतके’ सर्वाधिक रूग्ण

मिरा-भाईंदर (Mira-Bhayandar) महापालिका परिसरात रविवारी COVID-19 चे ३०३ नवीन रुग्ण आढळून आले. मिरा-भाईंदर महानगरपालिके (MBMC) ने दिलेल्या माहितीनुसार कोरोनामुळे दिवसभरात ४ जणांचा मृत्यू देखील झाला आहे.

Mira-Bhayandar: मिरा-भाईंदरमध्ये कोरोनाने तोडला रेकाॅर्ड, दिवसभरात ‘इतके’ सर्वाधिक रूग्ण
SHARES

मिरा-भाईंदर (Mira-Bhayandar) महापालिका परिसरात रविवारी COVID-19 चे ३०३ नवीन रुग्ण आढळून आले. मिरा-भाईंदर महानगरपालिके (MBMC) ने दिलेल्या माहितीनुसार कोरोनामुळे दिवसभरात ४ जणांचा मृत्यू देखील झाला आहे. 

या नवीन नोंदीनुसार मिरा-भाईंदर मध्ये COVID-19 चे एकूण ४३१४ पाॅझिटिव्ह रुग्ण झाले आहेत. तर कोरोनामुळे आतापर्यंत १६२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर दुसऱ्या बाजूला रविवारी १२५ कोरोना रुग्ण बरे होऊन आपापल्या घरी गेले आहेत. यामुळे शहरात आतापर्यंत ३०७१ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देखील मिळालेला आहे.    

महाराष्ट्र सरकारने लाॅकडाऊन शिथिल करण्याचं ठरवल्यानंतर मिरा-भाईंदर शहरात सकाळी ९ वाजेपासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवांव्यतीरिक्त इतर दुकाने सुरू करण्याची परवानगी महापालिकेने दिली होती. परंतु कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून पुन्हा एकदा शहरात कडक लाॅकडाऊन लागू करण्यात आला आहे. हा लाॅकडाऊन १ जुलैपासून सुरू झाला असून १० जुलैपर्यंत सुरू राहणार आहे.  

हेही वाचा- दिलासादायक! १०४ वर्षांच्या आजोबांची कोरोनावर मात

तर, राज्यात देखील लाॅकडाऊनचा कालावधी ३० जून रोजी संपल्यानंतर पुन्हा एकदा महिन्याभराने वाढवून तो ३१ जुलैपर्यंत करण्यात आलेला आहे. 

या लाॅकडाऊनच्या काळात मिरा-भाईंदर महापालिकेकडून रहिवाशांना काही दिशा-निर्देश जारी करण्यात आले आहेत. ते पुढीलप्रमाणे: 

  • सार्वजनिक ठिकाण, कार्यालयाच्या ठिकाणी फेस मास्क लावणं बंधनकारक
  • सार्वजनिक ठिकाणी वावरताना दोन व्यक्तींमध्ये ६ फुटांचं अंतर ठेवणं बंधनकारक 
  • कार्यक्रमात ५० जणच सहभागी होऊ शकतील, त्यासाठीही पूर्व परवानी आवश्यक 
  • सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, धूम्रपान आणि मद्य पिण्यास मनाई  
  • ज्या ठिकाणी शक्य असेल, तेथील कर्मचाऱ्यांना वर्क फ्राॅम होम देणं बंधनकारक
  • कामाच्या ठिकाणी सॅनिटायझेशन, मास्क, साेशल डिस्टन्स बंधनकारक  
Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा