Advertisement

कोरोनवर मात करण्यासाठी टाटा ग्रुपची महापालिकेला पुन्हा आर्थिक मदत


कोरोनवर मात करण्यासाठी टाटा ग्रुपची महापालिकेला पुन्हा आर्थिक मदत
SHARES

राज्यासह देशावर कोणतही संकट आलं की, टाटा ग्रुप नेहमी संकटाचा सामना करण्यासाठी आर्थिक मदतीचा हात पुढे करत. त्यानुसार, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेला करोनाच्या संकटाशी लढण्यासाठी तब्बल १० कोटी रुपये, १०० व्हेंटिलेटर आणि २० रुग्णवाहिका दिल्या आहेत. 

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सोमवारी हे सर्व सुपूर्द करण्यात आलं असून, कोरोनाच्या संकटात मुंबई महापालिका आणि टाटा ग्रुप प्लाझ्मा प्रकल्पावर एकत्रित काम करत आहेत. या प्रकल्पासाठी ही भरीव मदत करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी याबाबत टाटा ग्रुपचे आभार मानले असून ग्रुपचे कौतुक केले आहे.

मुख्यमंत्री कार्यालय व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी एका ट्वीटद्वारे याबाबत माहिती दिली आहे. करोनाच्या संकटात समाजाच्या सर्वच स्तरातून मदत मिळते आहे. टाटा ग्रुपसारख्या मोठ्या संस्थेकडून जेव्हा मदत मिळते तेव्हा काम करण्याचा उत्साह आणखी वाढत जातो. या सदिच्छांच्या जोरावर आपण कोरोनाविरोधातील लढा नक्कीच जिंकू, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. सोमवारी राज्यात कोरोनाचे २०४ जणांचा बळी गेल्याची नोंद करण्यात आली आहे. तर मुंबईत दिवसभरात १२०१ नवीन रुग्ण आढळल्याने कोरोनाशी दोन हात करणाऱ्या अत्यावश्यक सेवांवरील भार दिवसेंदिवस वाढतच आहे. मुंबईत सोमवारी दिवसभरात ३९ जणांचा मृत्यू झाला आहे. 

मागील दिवसांपासून मुंबईत कोरोनाचा मृत्यूदर दिवसेंदिवस वाढत आहे. मृतांच्या एकूण संख्येत सोमवारी भर पडली आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत कोरोनाचे ३९ रुग्ण दगावले आहेत. तर २७ जून रोजी ४१ मृत व्यक्तींची नोंद झाली आहे. त्या पूर्वी २६ जून रोजी एकूण ४४ जण या आजाराला बळी पडल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. 

या शिवाय, शनिवारी मुंबईत कोरोनाचे १२०१ नवीन रुग्ण आढळले आहेत. मुंबईत रुग्णांची एकूण संख्या आता ८५ हजार ३२६ इतकी झाली आहे. तर मुंबईत सोमवारी दिवसभरात १२६९ जणांनी कोरोनावर मात केली असून कोरोनाची लागण झालेल्या एकूण ५७ हजार १५२ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. त्यामुळं मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.हेही वाचा -

Hotel & Restaurant: राज्यात ८ जुलैपासून हाॅटेल-लाॅज उघणार, रेस्टाॅरंटबाबत निर्णय प्रलंबित

डोमिसाईल असेल तरच नोकरीची संधी, ठाकरे सरकारचा मोठा निर्णयRead this story in English
संबंधित विषय
POLL

आज रोहीतची पलटन हैदराबादला पहिल्या विजयापासून रोखू शकेल का ?
Submitting, please wait ...
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा