नवी मुंबईत चिंता वाढली, रुग्णदुपटीचा कालावधी घटला

नवी मुंबईत आता पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याचं दिसत आहेत. मागील पंधरा दिवसात रुग्ण संख्या वाढल्याने नवी मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी घटला आहे. रुग्ण दुपटीचा कालावधी आता ५८१ दिवसांवर आला आहे. 

दिवाळीनंतर नवी मुंबईत कोरोना रुग्णांत हळूहळू घट होत गेली. त्यामुळे रुग्णदुपटीचा कालावधी वाढून ७३५ दिवसांवर पोहचला होता. येथील कोरोनानियंत्रणात आल्याचं दिसून येत होते.  मात्र मागील पंधरा दिवसांत पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढण्यास सुरूवात झाली. त्यामुळे  रुग्ण दुपटीचा कालावधी ५८१ दिवसांवर आला.

पंधरा दिवसांपूर्वी नवी मुंबईतही रोज ४० च्या आत नवे रुग्ण आढळत होते. आता रोज ८० ते ९० रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे सातशेपर्यंत खाली आलेली उपचाराधीन रुग्णांच्या संख्येतही वाढ होत ती ८९७ पर्यंत गेली आहे.  ऑगस्टमध्ये ४५ दिवसांवर असलेल्या रुग्णदुपटीचा कालावधी हळूहळू वाढत जात जानेवारीत ६३४ तर फेबुवारीच्या २ तारखेपर्यंत ७३५ दिवसांपर्यंत म्हणजे दोन वर्ष कालावधीपर्यंत गेला होता. मात्र त्यानंतर रुग्णवाढ होत गेल्याने त्यात घट झाली आहे.  

नवी मुंबईत मंगळवारी (१६ फेब्रुवारी) कोरोनाचे नवीन ८९ रुग्ण सापडले आहेत. तर १ रुग्णाचा मृत्यू झाला. येथील एकूण रुग्णांची संख्या आता ५४ हजार १०६ झाली आहे.  बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५२,१०७  आहे. तर मृतांचा आकडा ११०२ झाला आहे. नवी मुंबईत सध्या ८९७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर कोरोनामुक्तीचा दर ९६ टक्के झाला आहे. 


हेही वाचा -

IRCTC कडून नवीन पेमेंट गेटवे लाँच

राज्यात ७ लाख ४१ हजार ३७० लाभार्थ्यांना कोविड लसीकरण


पुढील बातमी
इतर बातम्या