Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
59,08,992
Recovered:
56,39,271
Deaths:
1,11,104
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
15,773
700
Maharashtra
1,55,588
10,442

राज्यात ७ लाख ४१ हजार ३७० लाभार्थ्यांना कोविड लसीकरण

मुंबईत आतापर्यंत एकूण १ लाख २० हजार ५०१ लाभार्थ्यांचं लसीकरण करण्यात आले आहे.

राज्यात ७ लाख ४१ हजार ३७० लाभार्थ्यांना कोविड लसीकरण
SHARES

राज्यभरात मंगळवारी दिवसभरात ६५५ लसीकरण सत्रात एकूण २७,६९८ लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले. त्यापैकी, २३,२६१ लाभार्थ्यांना पहिल्या डोसचे व ४,४३७ लाभार्थ्यांना दुसऱ्या डोसचे लसीकरण करण्यात आले. ७,८८४ आरोग्य कर्मचारी लाभार्थ्यांना व १५,३७७ फ्रंटलाइन लाभार्थ्यांना पहिल्या डोसचे लसीकरण करण्यात आले.

राज्यात ४,४३७ आरोग्य कर्मचारी लाभार्थ्यांना दुसऱ्या डोसचे लसीकरण करण्यात आले. २७,३२४ लाभार्थ्यांना कोविशिल्ड या लसीने लसीकरण करण्यात आले आहे. त्यापैकी, २२,९४९ लाभार्थ्यांना पहिला डोस व ४,३७५ लाभार्थ्यांना दुसरा डोसचे लसीकरण करण्यात आले. ३७४ लाभार्थ्यांना कोव्हॅक्सिन या लसीने लसीकरण करण्यात आले आहे.

त्यापैकी, ३१२ लाभार्थ्यांना पहिला डोस व ६२ लाभार्थ्यांना दुसऱ्या डोसचे लसीकरण करण्यात आले. आजपर्यंत एकूण ७,४१,३७० लाभार्थ्यांना कोविड लसीकरण करण्यात आले आहे, अशी माहिती राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे. मुंबईत आतापर्यंत एकूण १ लाख २० हजार ५०१ लाभार्थ्यांचं लसीकरण करण्यात आले आहे.

ठाण्यात ७१ हजार ५०३, पुण्यात ६९ हजार १५६, नाशिक ३३ हजार ४७५ आणि नागपूरमध्ये ३२ हजार ६५५ लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले आहे. तर याखेरीज, दुसऱ्यांदा डोस घेतलेल्या लाभार्थ्यांची एकूण संख्या ९ हजार ११६ लाभार्थ्यांनी दुसरा डोस घेतला आहे, यात सर्वाधिक प्रमाण पुण्यात असून लाभार्थ्यांची संख्या ९४२ आहे. ठाण्यात ८४५, नागपूर ६७७ लाभार्थ्यांनी दुसरा डोस घेतला आहे.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा