Advertisement

IRCTC कडून नवीन पेमेंट गेटवे लाँच

रेल्वे प्रवाशांना इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशननं (आयआरसीटीसी) नवीन पेमेंट गेटवे आयटीसीटी-आयपे लाँच केलं आहे.

IRCTC कडून नवीन पेमेंट गेटवे लाँच
SHARES

रेल्वे प्रवाशांना इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशननं (आयआरसीटीसी) नवीन पेमेंट गेटवे आयटीसीटी-आयपे लाँच केलं आहे. यामुळे ट्रेन प्रवांशाना पेमेंट करणं सोपं होणार आहे. याशिवाय ट्रेन तिकिट रद्द करताच तात्काळ पैसे परत मिळणार आहेत. आयपे गेटवे सुविधेसह ऑटोपेची सुविधा आयआरसीटीसीनं दिली आहे.

रेल्वे प्रवाशांना सध्या तिकिट रद्द केल्यानंतर पैसे परत मिळविण्यासाठी २ ते ३ दिवस वाट पहावी लागते. पण यापुढे आता असे होणार नाही. रेल्वे तिकिट आयआरसीटीसी वेबसाइट किंवा मोबाइल अ‍ॅपवरून बुक केल्यावर आयआरसीटीसी आयपेद्वारे इन्स्टंट रिफंड मिळेल. आयआरसीटीसीनुसार, ऑटोपे अ‍ॅप फॅसिलिटीसाठी यूजर्सला तिकिट बुक करण्यास सुविधा होईल आणि तिकिट कॅन्सल करण्याच्या स्थितीत रिफंड प्रक्रिया सुद्धा सहज होईल.

तिकिट रद्द करताच तुम्हाला ताबडतोब युपीआय बँक खाते किंवा इतर पेमेंट साधनांद्वारे डेबिटची परवानगी द्यावी लागेल. यूजर्सला आपल्या युपाआय बँक अकाऊंटचे डेबिट कार्ड किंवा अन्य पेमेंट फॉर्मच्या वापरासाठी परवानगी आणि डिटेल आयटीसीटी-आयपे द्वारे पेमेंट करण्यासाठी द्यावे लागतील. आयआरसीटीसी भविष्यातील ट्रांजक्शनसाठी सुद्धा यूजर्स डिटेल्सचा वापर करू शकते.

तुम्हाला रेल्वे तिकिट आयपे गेटवेच्या ऑटोपेच्या अंतर्गत बुक करणं सोपं होणार आहे. त्याचबरोबर पेमेंट सुद्धा वेगानं होतं. पेमेंट वेगानं झाल्यानं प्रवाशांना कन्फर्म तिकिट घेण्यात सुद्धा सवलत मिळेल. हे तात्काळ तिकिट बुक करणार्‍यांसाठी आणखी सोपे माध्यम आहे.


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा