मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी तब्बल 'इतक्या' दिवसांवर

मुंबईतील कोरोना आता नियंत्रणात आल्याचं दिसून येत आहे. मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी तब्बल १३९ दिवसांवर गेला आहे. मुंबईतील रुग्णवाढीचा दर देखील अर्ध्या टक्क्यांपेक्षा कमी झाला आहे.

मुंबईत सोमवारी आणि मंगळवारी रुग्ण संख्या आणि मृतांची संख्या मोठ्या प्रमाणावर घटल्याचं आढळून आलं आहे. मंगळवारी मुंबईत ८०१ नवे रुग्ण आढळले. १०४३ रुग्ण बरे झाले आहेत. तर २३ रुग्णांचा मृत्यू झाला.

मुंबईतील सर्व २४ विभागातील रुग्ण दुपटीचा कालावधी १०० दिवसांच्या पुढे गेला आहे. परळ, शिवडीमध्ये रुग्ण दुपटीचा कालावधी सर्वात जास्त २९६ दिवस आहे. तर सर्वात कमी कालावधी दहिसर विभागाचा १०५ दिवस आहे. मुंबईतील एकूण कोरोना रुग्णांची संख्या २,५२,८८८ वर गेली आहे. आतापर्यंत २,२२,५०१ रुग्ण म्हणजेच ८८ टक्के रुग्ण बरे झाले आहेत. सध्या १९,२९० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

मुंबईत आतापर्यंत १४ लाख ६८ हजाराहून अधिक कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. मंगळवारी २३ रुग्णांचा मृत्यू झाला असून त्यात २१ रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये १६ पुरुष व ७ महिला होत्या.


हेही वाचा - 

कोरोना इफेक्ट : रुग्णांमध्ये आढळतोय मल्टीसिस्टम प्रक्षोभक सिंड्रोम

केंद्र सरकारची मोठी घोषणा! ‘या’ ठिकाणी लॉकडाऊन सक्तीचा


पुढील बातमी
इतर बातम्या