कल्याण-डोंबिवलीत रुग्ण दुपटीचा कालावधी २०६ दिवसांवर

कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात आता कोरोना रुग्णांची संख्या घटत आहे. सोमवारी या ठिकाणी अवघे ८८ नवीन रुग्ण आढळले. पालिका क्षेत्रात कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी तब्बल २०६ दिवसांवर पोहोचला आहे. तर रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९५ टक्क्यांवर गेलं आहे. मृत्युदर दोन टक्क्यांवर आला आहे. 

कल्याण-डोंबिवलीत ऑक्टोबरपर्यंत कोरोना रुग्णांची संख्या वाढत होती. मात्र, मागील १५ दिवसांपासून रुग्णांची संख्या घटत असल्याचं दिसून येत आहे. आतापर्यंत पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ५२,० २३ झाली आहे. यातील ४८६२६ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या एक हजार ६५२ रुग्ण विविध रुग्णालय, काळजी केंद्रात उपचार घेत आहेत. मागील दोन महिने पालिका क्षेत्रात रोज ३०० ते ५०० रुग्ण आढळत होते. गेल्या २० दिवसांपासून ही संख्या १०० ते १५० वर आली आहे.

पालिकेने कोरोना चाचण्यांची संख्याही वाढवली आहे. पालिकेतर्फे घरोघरी जाऊन सर्वेक्षण, साथसदृश रुग्णांवर तातडीने उपचार केले जात आहेत. तापसदृश लक्षणे दिसू लागली, की रुग्णांनी महापालिकेच्या आरोग्य केंद्रात जाऊन प्रतिजन चाचणी करून घेणे, चाचणी सकारात्मक आली तर तातडीने उपचार सुरू करणे, आपल्या संपर्कातील, कुटुंबातील सदस्यांच्या कोरोना चाचण्या करून घेणे, असे प्रकार वाढवले आहेत. 


हेही वाचा -

अखेर सीएसएमटी ते अंधेरी-गोरेगाव हार्बर सेवा सुरू

मेट्रो कारशेडचं काम थांबवा, केंद्राने सांगितला जागेवर हक्क


पुढील बातमी
इतर बातम्या