पनवेलमध्ये रुग्ण दुपटीचा कालावधी ४४ दिवसांवर

पनवेल महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. येथील कोरोना रुग्णांची एकूण संख्या २०१४६ झाली आहे. यामधील १७७९२ रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. 

पनवेल महापालिका हद्दीत कोरोना रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ४४ दिवसांवर आला आहे. मुंबईत  रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ६६ तर नवी मुंबई ८० दिवसांवर पोहोचला आहे. पनवेलमधील मृत्युदरही दुप्पट आहे. ४४ दिवसांत मृत्युदर दुपटीपेक्षा अधिक नोंदविला गेला आहे. आतापर्यंत ४५२ जणांचा मृत्यू झाला आहे.सध्या पालिका क्षेत्रातील ६६ हजार ९९२ नागरिकांची चाचणी करण्यात आली आहे. 

पनवेल महापालिका हद्दीत रविवारी १७३ नवीन कोरोना रुग्ण आढळले असून १८० रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. तर ५ मृत्यूंची नोंद झाली असून यामध्ये कामोठ्यातील २, खारघरमधील २ आणि पनवेलमधील एका रूग्णाचा समावेश आहे. सध्या पनवेल महापालिका हद्दीत कोरोनाचे १९०२ ॲक्टीव्ह रूग्ण आहेत.


हेही वाचा

शिवसेना नेते एकनाथ शिंदेंनी केली कारोनावर मात

रेमडेसिवीरच्या तुटवड्यामुळे रुग्णांचे प्रचंड हाल- देवेंद्र फडणवीस


पुढील बातमी
इतर बातम्या