Advertisement

शिवसेना नेते एकनाथ शिंदेंनी केली कारोनावर मात

कोविड-१९ ची लागण झाल्यानंतर उपचार सुरु असतानाही शिंदे यांनी रुग्णालयातूनही आपलं काम सुरुच ठेवलं होतं.

शिवसेना नेते एकनाथ शिंदेंनी केली कारोनावर मात
SHARES

शिवसेनेचे दिग्गज नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी कोरोनावर मात केली. शिंदे यांची दुसरी कोविड चाचणी निगेटीव्ह आल्यामुळं त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत खुद्द एकनाथ शिंदे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती दिली आहे. सध्या ते घरातच क्वारंटाईन झाले आहेत.

हेही वाचाः- सुशांत सिंह प्रकरण: हत्या नव्हे, आत्महत्याच! एम्सचा रिपोर्ट सीबीआयला सादर

कोविड-१९ ची लागण झाल्यानंतर उपचार सुरु असतानाही शिंदे यांनी रुग्णालयातूनही आपलं काम सुरुच ठेवलं होतं. सोशल मीडियावर त्यांच्या यादरम्यानचा व्हिडिओ प्रचंड चर्चेत आला होता. लोकोपयोगी कामांमध्ये अडथळा येऊ नये यासाठी त्यांनी घेतलालहा निर्णय अनेकांची मनं जिंकून गेला. एकनाथ शिंदे आता कोरोनावरील उपचारांनंतर स्वगृही परतल्यामुळं समर्थकांमध्ये आनंद तर आहेच. पण, येत्या काळात आता नव्या जोमानं ते राज्याप्रती आणि जनतेप्रती असणारी जबाबदारी कशी पार पाडतात याबाबतची अनेकांमध्ये उत्सुकता आहे.

हेही वाचाः-हॉटेल-रेस्टॉरंटसाठी बीएमसीची नियमावली जारी

देशभरात कोरोना व्हायरसची लागण होणाऱ्या रुग्णसंख्येत झपाट्यानं वाढ होत आहे. दर दिवशी संपूर्ण देशात हजारो संख्येनं नवे कोरोनाबाधित असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून देण्यात येत आहे. देशात ही परिस्थिती असतानाच राज्यातही चित्र जवळपास एकसारखंच आहे. महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता प्रशासन आणि आरोग्य यंत्रणाही या संसर्गावर नियंत्रण मिळवण्याच्या प्रयत्नांच आहे. अगदी राज्याच्या मंत्रिमंडळातील मंत्रीसुद्धा कोरोनाविरोधातीय या युद्धाच उतरले आहेत.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा