सुशांत सिंह प्रकरण: हत्या नव्हे, आत्महत्याच! एम्सचा रिपोर्ट सीबीआयला सादर

रिपोर्टमध्ये सुशांतच्या हत्येचा दावा पूर्पणणे फेटाळण्यात आला असून त्याने आत्महत्या केल्यावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचं वृत्त आहे.

सुशांत सिंह प्रकरण: हत्या नव्हे, आत्महत्याच! एम्सचा रिपोर्ट सीबीआयला सादर
SHARES

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने आत्महत्या केली की त्याची हत्या करण्यात आली, याप्रकरणी तपास करणाऱ्या सीबीआयला एम्सच्या फॉरेन्सिक एक्सपर्ट टीमने आपला रिपोर्ट सुपूर्त केला आहे. या रिपोर्टमध्ये सुशांतच्या हत्येचा दावा पूर्पणणे फेटाळण्यात आला असून त्याने आत्महत्या केल्यावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचं वृत्त आहे. (AIIMS medical report claims that actor sushant singh rajput death caused by suicide)

सुशांतचा पोस्टमॉर्टम तसंच व्हिसेरो रिपोर्टचा अभ्यास करून अहवाल देण्याची विनंती सीबीआयने एम्स रुग्णालयाकडे केली होती. त्यानुसार एम्स रुग्णालयाने डॉक्टर सुधीर गुप्ता यांच्या नेतृत्त्वाखाली तज्ञ डॉक्टरांची एक टीम नेमली होती. त्यानुसार या टीमने सर्व शक्यतांचा विचार करून रिपोर्टचा अभ्यास केला. या अभ्यासानंतर सादर केलेल्या अहवालात, बॉम्बे टॉक्सिक सायन्स लॅब तसंच एम्स टॉक्सिकोलोजी लॅबमध्ये केलेल्या तपासणीत सुशांतच्या शरीरात कोणतेही विषारी पदार्थ आढळून आले नाहीत. सुशांतच्या शरीरावर गळफासशिवाय इतर कोणत्याही जखमा नव्हत्या. गळ्यावर असलेला डाग हा गळफासामुळेच होता. तसंच शरीर आणि कपड्यांची कुठलीही ओढाताण झालेली दिसली नाही. त्यामुळे हे प्रकरण गळफास लावून आत्महत्या केल्याचच दिसून येत असल्याचं डाॅ. सुधीर गुप्ता यांनी नमूद केल्याचं म्हटलं जात आहे.

हेही वाचा- सुशांतच्या शरीरात कोणतेही विषारी अंश सापडले नाहीत, एम्सचा खुलासा

एम्सच्या फॉरेन्सिक तज्ज्ञांची टीम या तपासाबाबत सीबीआय सातत्याने चर्चा करत होती. सुशांतचं शवविच्छेदन करणार्‍या मुंबईतील कूपर रुग्णालयाच्या पॅनेलने देखील सुशांतचा मृत्यू आत्महत्यनेच झाल्याचं म्हटलं होतं.  

एम्सच्या डॉक्टरांनी दिलेला अहवाल आणि तपासात समोर आलेल्या गोष्टी एकत्र करुन सीबीआयकडून पडताळून पाहिल्या जात आहेत. त्यानंतरच सीबीआय अंतिम निष्कर्षापर्यंत पोहोचेल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

दुसऱ्या बाजूला नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोमार्फत या प्रकरणातील अंमली पदार्थांच्या दृष्टीकोनातून तपास सुरू आहे. या तपासाअंतर्गत आतापर्यंत रिया चक्रवर्ती, शौविक चक्रवर्ती, सॅम्युअल मिरांडा आणि दीपेश सावंत यांच्यासह अनेक ड्रग्ज डीलर्सना अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा- सुशांत सिंह प्रकरण: एम्सच्या अहवालामुळे भाजपचं तोंड काळं- काँग्रेस

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा