Advertisement

सुशांत सिंह प्रकरण: एम्सच्या अहवालामुळे भाजपचं तोंड काळं- काँग्रेस

मुंबई व महाराष्ट्राची बदनामी करण्यासाठी षडयंत्र करण्यामागे भाजपा आणि मोदी सरकारमधील मास्टरमाईंड सीबीआयने चौकशी करून शोधावे,अशी खरमरीत टीका काँग्रेसने भाजपवर केली आहे.

सुशांत सिंह प्रकरण: एम्सच्या अहवालामुळे भाजपचं तोंड काळं- काँग्रेस
SHARES

एम्सने सुशांत सिंह राजपूत प्रकरणात निर्वाळा दिला की त्याच्या शरीरात कोणतंही विष आढळलं नाही. यातून भाजपाचे तोंड काळे झालं आहे. मुंबई व महाराष्ट्राची बदनामी करण्यासाठी षडयंत्र करण्यामागे भाजपा आणि मोदी सरकारमधील मास्टरमाईंड सीबीआयने चौकशी करून शोधावे,अशी खरमरीत टीका काँग्रेसने भाजपवर केली आहे. (congress spokesperson sachin sawant slams bjp and modi government over SSR case)

यासंदर्भात भाष्य करताना काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत म्हणाले, सुशांत सिंह राजपूत प्रकरणामध्ये एम्सने जो रिपोर्ट दिलाय, त्यातून पूर्णपणे स्पष्ट झालेलं आहे की त्याच्यात विषाचा कोणताही अंश नव्हता. याचाच अर्थ भारतीय जनता पक्षाचं केवढं मोठं हिन पातळीचं षडयंत्र होतं, ते देखील याच्यातून उघड झालेलं आहे. एकंदरीतच देशपातळीवर ढासळलेली अर्थव्यवस्था, कोरोना संकट, बेरोजगारी, शेतकऱ्यांना भेडसावणारे प्रश्न हाताळण्यात मोदी सरकारला जे अपयश आलं आहे, तिकडून लोकांना दुसरीकडे लक्ष वळवण्यासाठी, बिहारच्या निवडणुकीत सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूचा फायदा मेलेल्या व्यक्तीच्या टाळूवरंच लोणी खाता यावं यासाठी रचलेलं हे षडयंत्र होतं, असा दावा सचिन सावंत यांनी केला.

हेही वाचा - ड्रग्ज रॅकेटप्रकरणी कंगनाची चौकशी का नाही?- सचिन सावंत

तिसरीकडे महाराष्ट्र सरकारला बदनाम करून सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न देखील यामध्ये होता. हे असं एकमेव प्रकरण असेल, ज्यात राजकीय कारणाकरीता जाणीवपूर्वक तीन तीन राष्ट्रीय एजन्सी आणण्यात आल्या. या एजन्सी जनतेच्या पैशातून काम करतात. याचाच अर्थ असा की हिन राजकारणाकरीता जनतेच्या पैशांची उधळण करण्यात आली. हे देखील यातून स्पष्ट होतं. म्हणूनच जनता निश्चितपणे त्यांना माफ करणार नाही. 

एकंदरीत हे जे प्रकरण होतं, त्यातून संघराज्य प्रणाली पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आली. कायद्याचं उल्लंघन करण्यात आलं. मुंबई पोलीस, महाराष्ट्राची बदनामी करण्यात आली. १३ कोटी जनतेचा अपमान करण्यात आला. भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी त्याला साथ दिली. शिवाय या प्रकरणाचे जे बँड अॅम्बेसेडर आहेत. गुप्तेश्वर पांडे सारखे त्यांची व्हिआरएस मंजूर केली जाते, त्यांना जेडीयूत प्रवेश दिला जातो, आणि आता ते बिहार विधानसभा निवडणूकही लढणार आहेत. किती मोठ्या पातळीवर या सगळ्या संस्थांच हसू करण्यात आलं, असंही सचिन सावंत यांनी सांगितलं.

म्हणूनच आम्ही सीबीआयकडे ही मागणी करत आहोत की तुम्हाला या प्रकरणात आणण्यामागे काय षडयंत्र होतं, त्यामागे भाजपमधील मास्टरमाईंड कोण होता, याचा तपास करुन त्यांनी हे उघड केलं पाहिजे. या संस्थांचा अपमान करताना गोदी मीडियाने जी मीडिया ट्रायल केली, ती देखील उघडी पडली आहे. म्हणूनच जनता त्यांना माफ करणार नाही, हे निश्चित आहे, असं सचिन सावंत म्हणाले.

  हेही वाचा - भारत का GDP डुबा, तब रसोडे में मोदी जी थे... सचिन सावंत यांचा हल्लाबोल


संबंधित विषय
Advertisement