Advertisement

ड्रग्ज रॅकेटप्रकरणी कंगनाची चौकशी का नाही?- सचिन सावंत

​​​​बाॅलिवूड आणि ड्रग्ज माफियांचं कनेक्शन असल्याचा दावा करणारी अभिनेत्री कंगना रणौतची चौकशी न करणारं अंमलीपदार्थ विरोधी पथक (नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो) हे नमो कंट्रोल्ड ब्युरो झालं आहे का? असा प्रश्न काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.

ड्रग्ज रॅकेटप्रकरणी कंगनाची चौकशी का नाही?- सचिन सावंत
SHARES

बाॅलिवूड आणि ड्रग्ज माफियांचं कनेक्शन असल्याचा दावा करणारी अभिनेत्री कंगना रणौतची चौकशी न करणारं अंमलीपदार्थ विरोधी पथक (नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो) हे नमो कंट्रोल्ड ब्युरो झालं आहे का? असा प्रश्न काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. व्हाॅट्सअॅप चॅटवरून जर ‘एनसीबी’ गुन्हा दाखल करत असेल तर कंगनाच्या व्हिडिओवरून चौकशी का केली जात नाही, असा सवालही सावंत यांनी उपस्थित केला आहे. (congress leader sachin sawant questioned ncb for not doing inquiry of actress kangana ranaut in bollywood drug connection)

याबाबत बोलताना सचिन सावंत यांनी भाजपवर देखील आरोप केले आहेत. ते म्हणाले की, एनसीबी हे नमो कंट्रोल ब्युरो झालं आहे का? असा आम्ही प्रश्न उपस्थित करत आहोत. असं जर नसेल, तर भारतीय जनता पक्षाचं जे ड्रग्ज कनेक्शन आहे, जे सँडलवूडमध्ये देखील आहे, बाॅलिवूडमध्ये देखील आहे आणि गोव्यात देखील आहे. त्याची एनसीबी अद्याप चौकशी का करत नाहीय, असा प्रश्न उपस्थित होतो. इथं अवघ्या ५९ ग्रॅम गांजावर मोठ्या प्रमाणात नॅरेटिव्ह तयार करण्यात आलं आहे. परंतु बाजूलाच भारतीय जनता पक्षाचा एक कार्यकर्ता चंद्रकांत चव्हाण कर्नाटकमध्ये पकडला गेला त्याच्याकडून १२०० किलोचा गांजा हस्तगत करण्यात आला आहे. मात्र एनसीबीने ढुंकूनही तिकडे पाहिलेलं नाही, याकडे सचिन सावंत यांनी लक्ष वेधून घेतलं.

हेही वाचा - कंगना आॅफिस तोडफोड प्रकरण: न्यायालयाने बीएमसीला 'या' शब्दांत सुनावलं

त्यांनी पुढं सांगितलं, कर्नाटकातील ज्या सँडलवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये ड्रग्ज रॅकेट समोर आलेलं आहे, तिथं भाजपची स्टार कॅम्पेनर रागिनी द्विवेदी प्रमुख आरोपी म्हणून पकडली गेली आहे. त्याच केसमध्ये १२ लोकं पकडले गेले आहेत, त्यामध्ये आदित्य अल्वा नावाची एक व्यक्ती आहे. जो गुजरातचा भाजपचा स्टार कॅम्पेनर असलेला विवेक आॅबेराॅयचा सख्खा मेव्हणा आहे. विवेक आॅबेराॅय म्हणजे ज्या व्यक्तीने नरेंद्र मोदींचा बायोपिक बनवला होता, तोच त्या सिनेमाचा प्रोड्युसर होता, जो संदीप सिंगचा पार्टनर देखील आहे. या दोघांना गुजरात सरकारने १७७ कोटींचा एमओयू करण्यासाठी खास बोलावून घेतलं होतं. त्यातही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संदीप सिंगने ते ५३ फोन काॅल भाजपच्या महाराष्ट्र कार्यालयातील कोणत्या नेत्याला केले होते, हे अजूनही समोर आलेलं नाही. त्याला माॅरिशसमध्ये कोणी मदत केली, हे देखील कळलेलं नाही, त्याचा खुलासा का होत नाहीय, असा प्रश्न सचिन सावंत यांनी उपस्थित केला. 

राज्य सरकारतर्फे सीबीआयला विनंती करण्यात आली आहे की हा जो ड्रग अँगल आहे, त्याची देखील चौकशी करण्यात यावी, परंतु अद्याप कुणालाही बोलवण्यात आलेलं नाही. व्हाॅट्सअॅप चॅटवरून जर गुन्हा दाखल होऊ शकतो, चौकशी केली जाऊ शकते, तर कंगना रणौतचे तर व्हिडिओ, मॅसेजेस आहेत. तिने स्वत: कबूल केलेलं आहे. ती काय बाॅलिवूडमधली नाही का? त्यामुळे याची उत्तरं एनसीबीने दिली पाहिजे, अशी मागणी सचिन सावंत यांनी केली आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा