ठाणे महापालिका क्षेत्रात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र, बरे होणाऱ्या रुग्णांचं प्रमाणही वाढून ९० टक्क्यांवर गेलं आहे. तर रुग्णदुपटीचा कालावधीही वाढून ७७ दिवस झाला आहे. काही दिवसांपूर्वी रुग्णदुपटीचा कालावधी ६९ दिवस होता. तो आता ७७ दिवसांवर पोहोचला आहे.
पालिका क्षेत्रातील मृत्युदरही २.७८ टक्क्य़ांवरून २.५६ टक्क्यांवर आला आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढविण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात होत्या. त्याचा सकारात्मक परिणाम आता दिसू लागला आहे. पालिका क्षेत्रात ऑगस्ट महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आला होता. यावेळी रुग्ण दुपटीचा कालावधी ९० दिवस होता. मात्र, सप्टेंबर महिन्यात रुग्ण वाढू लागली. त्यामुळे रुग्ण दुपटीचा कालावधी ६० दिवसांवर आला.
गेल्या काही दिवसांपासून त्यामध्येही सुधारणा होऊ लागली आहे. काही दिवसांपूर्वी रुग्ण दुपटीचा कालावधी आता ६९ दिवसांवर आला होता. तर, आता रुग्ण दुपटीचा कालावधी ७७ दिवसांवर आला आहे.
कोरोनाच्या नियमांचं पालन करण्याचे पालिका प्रशासनाचं आवाहन
बनावट ओळखपत्राद्वारे रेल्वे प्रवास; सर्वाधिक ओळखपत्र महापालिकेच्या नावानं