Advertisement

कोरोनाच्या नियमांचं पालन करण्याचे पालिका प्रशासनाचं आवाहन

छोट्या समारंभांनी कोरोनाचा फैलाव होऊ शकतो याची भिती लक्षात घेत मुंबई महापालिकेनं (bmc) पुन्हा एकदा नागरिकांना कोरोनाचे नियम पाळण्याचं आवाहन केलं आहे.

कोरोनाच्या नियमांचं पालन करण्याचे पालिका प्रशासनाचं आवाहन
SHARES

मार्च महिन्यात मुंबईच कोरोनानं (corona) शिरकाव केला असून, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं लॉकडाऊन (lockdown) लागू करण्याचा निर्णय घेतला. या लॉकडाऊनमुळं मुंबईसह राज्यभरातील सर्वच व्यवसाय ठप्प झाले होते. सण, उत्सव, लग्न समारंभ यांसारख्या अनेकावर कोरोनाचं संकट ओढावलं होतं. परंतू, 'मिशन बिगिन अगेन' अंतर्गत (mission begin again) पुन्हा सर्व व्यवसायांना सुरूवात झाली. मुंबईचं अर्थचक्र हळुहळू रुळावर येत आहे. मात्र, असं असलं तरी छोट्या समारंभांनी कोरोनाचा फैलाव होऊ शकतो याची भिती लक्षात घेत मुंबई महापालिकेनं (bmc) पुन्हा एकदा नागरिकांना कोरोनाचे नियम पाळण्याचं आवाहन केलं आहे.

दक्षिण भारतातील चेन्नईमध्ये छोट्या समारंभांनी कोरोनाचा मोठा फैलाव केल्याचं वृत्त समोर आल्यानंतर मुंबईत अशा प्रकारचा फैलाव होऊ नये म्हणून मुंबई महापालिकेनं पुन्हा एकदा नागरिकांना कोरोनाचे नियम पाळण्याचं आवाहन केलं आहे. गणेशोत्सवानंतर मुंबईच्या कोरोना रुग्णांमध्ये वाढ झाल्याचा अनुभव मुंबईकरांनी घेतला. विशेषत: नवरात्रौत्सवात मोठ्या प्रमाणावर सामाजिक अंतराचं नियम पायदळी तुडवलं जात असल्याचं चित्र असून, मास्क परिधान करण्याबाबतही मुंबईकर निष्काळजीपणा करीत असल्याचं पाहायला मिळत आहे.

सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळांनी (navratri) मंडपात पोस्टर्स लावले म्हणजे नियम पाळले गेले, असे होत नाही. प्रत्यक्षात कार्यवाही गरजेची असून कार्यकर्त्यांनी आरती करताना मास्क, सामाजिक अंतर राखण्याचा नियम पाळावा. सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार नाही याकडे लक्ष दिले पाहिजे, असे आवाहन महापालिकेनं केलं आहे.

नवरात्रौत्सवाव्यतिरिक्त वाढदिवस किंवा तत्सम कार्यक्रम आयोजित करण्यावर भर दिला जात आहे. अशा कार्यक्रमात एकास जरी कोरोनाची लागण झाल्यास इतरांनाही त्याचा फटका बसू शकतो. परिणामी छोटे समारंभ आयोजित करू नका. गर्दी करू नका. कोरोनाचे नियम पाळा, असे आवाहन सातत्याने मुंबई महापालिका करत आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा