इंदिरा गांधी रुग्णालयातील ७ परिचारिका, १ डायलिसिस तंत्रज्ञ, १ सेवक व २ सेविका अशा ११ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. मीरा-भाईंदर शहरात पंडित भीमसेन जोशी आणि इंदिरा गांधी रुग्णालयात प्रसूतिगृहाची निर्मिती करण्यात आली आहे. पंडित भीमसेन जोशी रुग्णालय हे कोविड रुग्णालय केल्याने त्यामधील प्रसूतिगृह बंद करण्यात आले आहे. त्यामुळे प्रसूतीसाठी गांधी रुग्णालयात महिलांची संख्या वाढली आहे. डायलिसिस व बाह्योपचारसाठी दैनंदिन रुग्णसुद्धा वाढले आहेत. परंतु या रुग्णांची कोरोना चाचणी केली गेलेली नसताना दुसरीकडे कर्मचाऱ्यांनादेखील आवश्यक सुरक्षा साहित्य दिले जात नसल्याने कोरोना संसर्गाचा धोका वाढला आहे.
हेही वाचा -
मुंबई महापालिकेला मिळणार ८५ नव्या रुग्णवाहिका
Coronavirus Updates: उबर अॅपवरून बुक करा रुग्णवाहिका