मुंबईतील कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ झाल्यानं रुग्णवाहिकांची संख्याही अपुरी पडत आहे. दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांचा वाढता आकडा लक्षात घेता महापलिकेनं या समस्येवर मात करण्यासाठी आपल्या ताफ्यातील रुग्णवाहिकांची संख्या १००वरून ४५०वर नेली. तसंच, आता या रुग्णवाहिका उबर अॅपवर उपलब्ध करून देण्यासाठी कंपनीची मदत घेतली जाणार आहे.
पालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी मंगळवारी याबाबत माहिती दिली. या वाढीव रुग्णवाहिकांचे व्यवस्थापन संगणकीकृत प्रणालीद्वारे करण्यात येणार आहे. त्यासाठी 'उबर'च्या धर्तीवर अॅप तयार केले जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.
मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे, राज्यात मागील २४ तासात कोरोनाने ९७ जणांचा बळी गेल्याची नोंद करण्यात आली आहे. तर मुंबईत दिवसभरात १००२ नवीन रुग्ण आढळल्याने कोरोनाशी दोन हात करणाऱ्या अत्यावश्यक सेवांवरील भार दिवसेंदिवस वाढतच आहे. मुंबईत मंगळवारी दिवसभरात ३९ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनाबाधीत रुग्णांमध्ये मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे.
हेही वाचा -
रेड झोनमध्येही दुकाने सुरू होण्याची शक्यता
व्हॉट्सअॅप असताना टेंशन कशाला, घरबसल्या करा सिलिंडर बुकिंग