Advertisement

मुंबई महापालिकेला मिळणार ८५ नव्या रुग्णवाहिका

पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकारातून बृहन्मुंबई महानगरपालिकेला येणाऱ्या काळात ८५ रुग्णवाहिका मिळणार आहेत.

मुंबई महापालिकेला मिळणार ८५ नव्या रुग्णवाहिका
SHARES

एका बाजूला कोरोनाचा संकट वाढत असताना पायाभूत सोई-सुविधांवरही ताण पडत आहे. राज्य सरकार सर्व प्रकारच्या वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देतच आहे. पण त्याचसोबत राजकीय नेते मंडळी, सामाजिक संस्था, खासगी कंपन्या देखील आपापल्या पद्धतीने पुढाकार घेऊन सोयी-सुविधांमधील कमतरता भरून काढण्याचा प्रयत्न करत आहे. याच पद्धतीने मुंबई महापालिकेला रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. 

पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकारातून बृहन्मुंबई महानगरपालिकेला येणाऱ्या काळात ८५ रुग्णवाहिका मिळणार आहेत. त्यापैकी २४ रुग्णवाहिकांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, महापौर किशोरी पेडणेकर यांच्या उपस्थितीत बीकेसी इथं लोकार्पण करण्यात आलं.

हेही वाचा - मुंबईतील 'ही' ठिकाणं कोरोनाचे नवे हॉटस्पॉट

नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातर्फे आणि डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीने पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त ३० रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यापैकी १२ रुग्णवाहिकांचं पहिल्या टप्प्यात लोकार्पण करण्यात आलं. त्याचप्रमाणे झी समूह, महिंद्रा एन्ड महिंद्रा, दीपक फर्टिलायझर्स यांनी देखील १२ रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या आहेत.

सध्याच्या स्थितीत आरोग्य यंत्रणेवर ताण असल्याने काही वेळेस रुग्णाला आपत्कालीन परिस्थितीतही रुग्णवाहिका मिळू शकत नाही. मागील काही दिवसांमध्ये अशा बऱ्याच घटना घडलेल्या आहेत. या रुग्णवाहिकांमुळे ही कमतरता थोड्याफार प्रमाणात भरून निघण्यास मदत होईल. या रुग्णवाहिका हाती आल्यानंतर रुग्णांना योग्य वेळेत सेवा मिळाल्यास त्याला ताबडतोब वैद्यकीय उपचार मिळू शकतील. 

हेही वाचा - मुंबईत 113 टक्के नालेसफाई, महापालिकेचा दावा

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा