Advertisement

मुंबईत 113 टक्के नालेसफाई, महापालिकेचा दावा

मुंबई शहर आणि उपनगरात यंदा ११३ टक्के नालेसफाई झाल्याचा दावा मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी केला आहे.

मुंबईत 113 टक्के नालेसफाई, महापालिकेचा दावा
SHARES
मुंबई शहर आणि उपनगरात यंदा ११३ टक्के नालेसफाई झाल्याचा दावा मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी केला आहे. पावसाळ्यापूर्वी गाळ काढण्याचे जेवढे लक्ष्य ठेवण्यात आले होते. त्यापेक्षाही जास्त गाळ काढल्याचा दावा पालिकेने केला आहे.

पालिकेची संपूर्ण यंत्रणा कोरोनाच्या लढाईत गुंतलेली असल्यामुळे यंदा नालेसफाईला एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात सुरुवात झाली होती. पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी तीन पाळ्यांमध्ये काम करण्याचे आदेश दिले होते. उशिरा सुरुवात होऊनही नालेसफाईची कामे वेगानं झाल्याचा दावा पालिकेनं केला आहे.   

नालेसफाईसाठी यंदा १०० कोटींहून अधिक रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यंदा पावसाळ्यापूर्वी नाल्यांमधून दोन लाख ५३ हजार मेट्रिक टन गाळ काढायचा होता. पालिकेने तब्बल दोन लाख ८७ हजार मेट्रिक टनहून अधिक गाळ काढला आहे. मिठी नदीतून ९८ हजार ५७८ मेट्रिक टन गाळ काढायचा होता. प्रत्यक्षात एक लाख सात हजार मेट्रिक टन गाळ काढण्यात आला. म्हणजे नाल्यातून ११३ टक्के तर मिठी नदीतून १०८ टक्के गाळ काढण्यात आल्याचा दावा पालिकेने केला आहे. या कामांची सर्व माहिती जीपीएस यंत्रणेद्वारे आणि विशिष्ट संगणकीय पद्धतीने दस्तऐवज स्वरूपात उपलब्ध असल्याचेही पालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

शहर भागात गाळ काढण्याची कामे ११९.०३ टक्के, पूर्व उपनगरात ११७.०७ टक्के आणि पश्चिम उपनगरात ११०.५० टक्के अशी सरासरी ११३.५० टक्के कामे पूर्ण झाली आहेत. मुंबईत मोठय़ा पर्जन्यवृष्टीची शक्यता लक्षात घेऊन शहरांसाठी १२०, पूर्व उपनगरासाठी १०० आणि पश्चिम उपनगरातील १०५ असे एकूण ३२५ उदंचन पंप मनुष्य बळासह तैनात ठेवले आहेत.

दरम्यान, मुंबई महापालिका आयुक्तांचा ११३ टक्के नालेसफाईचा दावा २२६ टक्के खोटा असून ही नालेसफाई नसून हातसफाई आहे, अशी टीका भाजपनेते आमदार आशिष शेलार यांनी केली आहे.  दरवर्षी नालेसफाईच्या आकडेवारीचा डोंगर उभा केला जातो. आयुक्त मोठमोठे दावे करतात आणि पहिल्याच पावसात ते वाहून जातात. टेंडरपासून सफाईपर्यंत आकडेवारीची हातसफाई वर्षानुवर्षे सुरू आहे. जर नालेसफाई झाली तर गाळ कुठे टाकला? वजन काटय़ाची आकडेवारी जाहीर का करीत नाही? सीसीटीव्ही चित्रण का जाहीर करीत नाही?, असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केले आहेत.



हेही वाचा -

दिलासादायक! तब्बल 'इतक्या' कॅन्सरग्रस्तांची कोरोनावर मात

सोमवारपासून ऑनलाइन शिक्षण सुरू; विद्यार्थी, पालकांमध्ये उत्साह




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा