नवी मुंबईत 'इथं' आढळला ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण

नवी मुंबईत कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन प्रकाराचा पहिला रुग्ण वाशीत आढळून आला. केनियाला गेलेल्या १९ वर्षीय तरुणाची १८ डिसेंबर रोजी चाचणी पॉझिटिव्ह आली. त्याला कुठलीच लक्षणं नाहीत. महाराष्ट्रात सोमवारपर्यंत ओमिक्रॉन प्रकारची ५४ प्रकरणं आढळून आली.

“वाशीतील रुग्ण हा १९ वर्षांचा असून, तो कामानिमित्त केनियात होता. गेल्या आठवड्यात तो केनियाहून हैदराबादला गेला. हैदराबाद विमानतळावर त्यांचे आरटी-पीसीआर करण्यात आले. मात्र, त्यांनी विमानानं प्रवास करण्याऐवजी टॅक्सीनं मुंबईला जाण्याचा प्रवास केला. १८ तारखेला त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला त्यानंतर त्यांनी नानावटी रुग्णालयात जाऊन पुन्हा स्वॅब घेतला. त्याच्या आईला हैद्राबादहून फोन आला की तो ओमिक्रॉन पॉझिटिव्ह आहे,” असं वैद्यकीय आरोग्य अधिकारी प्रमोद पाटील यांनी सांगितलं.

१९ वर्षीय तरुण ४ मजली इमारतीत राहतो आणि प्रत्येक मजल्यावर चार फ्लॅट्स आहेत. ही इमारत १० दिवसांसाठी सील करण्यात आली आहे. त्याच्या सर्व जवळच्या संपर्कातील प्रतिजन चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत. त्यांचे आरटी-पीसीआर रिपोर्ट्सची प्रतीक्षा आहे. सर्व सोसायटी सदस्यांचीही चाचणी घेतली जाईल, असं पाटील यांनी सांगितलं.

नवी मुंबईतील रूग्णालयात या रूग्णाला आयसोलेट करण्यात आलं आहे, जिथे ओमिक्रोन रूग्णांसाठी स्वतंत्र आयसोलेशन वॉर्ड तयार करण्यात आला आहे.


हेही वाचा

कोविड मृतांच्या कुटुंबियांना ‘या’ आठवड्यात मिळणार आर्थिक मदत

पूर्ण लसीकरण झालेल्या ८० टक्के नागरिकांना ओमिक्रॉनची लागण

पुढील बातमी
इतर बातम्या