Advertisement

ऑमिक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात; पण परिस्थिती दिलासादायक!

देशात कोरोनाचा नवा व्हेरिएंट ऑमिक्रॉनच्या रुग्णांची संख्या २०० वर पोहोचली आहे. यामध्ये सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत.

ऑमिक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात; पण परिस्थिती दिलासादायक!
SHARES

देशात कोरोनाचा नवा व्हेरिएंट ऑमिक्रॉनच्या रुग्णांची संख्या २०० वर पोहोचली आहे. यामध्ये सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत. राज्यात ऑमिक्रॉनबाधितांची संख्या ५४ वर गेली आहे. ही रुग्णसंख्या ५४ वर असली तरी, यामधील २८ रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळं राज्यासाठी ही दिलासादायक बातमी आहे.

देशातील ऑमिक्रॉनबाधित रुग्णांची संख्या २०० वर पोहोचली असून, महाराष्ट्र आणि दिल्लीत प्रत्येकी ५४ रुग्ण आढळले आहेत. मात्र, महाराष्ट्रातील ५४ रुग्णांपैकी २८ रुग्ण बरे झाले असून, त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे.

महाराष्ट्रातील एकूण ५४ रुग्णांपैकी मुंबईत सर्वाधिक २३ रुग्ण सापडले आहेत. पिंपरी - चिंचवड ११, पुणे ग्रामीणमध्ये ७ आणि पुणे शहरात तीन ऑमिक्रॉनचे रुग्ण आहेत. सातारामध्ये ३, कल्याण-डोंबिवली आणि उस्मानाबादमध्ये प्रत्येकी २ रुग्ण आढळले आहेत.

महाराष्ट्रात आतापर्यंत विमानतळांवर २२ हजार आंतरराष्ट्रीय प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली आहे. त्यातील ८३ जणांचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जवळपास ६०० हून अधिक नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी ५४ जणांना ऑमिक्रॉनचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

महाराष्ट्रात ऑमिक्रॉनबाधित रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. एकूण २३ रुग्ण हे ओमिक्रॉनबाधित आढळले आहेत. यात १३ जणांचा आंतरराष्ट्रीय प्रवासाचा इतिहास आहे. तर १० रुग्ण या परिसरातील आहेत. आतापर्यंत १३ रुग्णांना बरे झाल्यानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे.

देशभरातील ऑमिक्रॉन रुग्णांची आकडेवारी

  • महाराष्ट्र - ५४
  • दिल्ली - ५४
  • तेलंगणा - २०
  • कर्नाटक - १९
  • राजस्थान - १८
  • केरळ - १५
  • गुजरात - १४
  • उत्तर प्रदेश - २
  • आंध्र प्रदेश, छत्तीसगड आणि तामिळनाडू, पश्चिम बंगालमध्ये प्रत्येकी १ रुग्ण
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा