दोन डोस घेऊनही प्रमाणपत्रात एक डोस घेतल्याचं नमूद

कल्याणमध्ये राहणाऱ्या ६७ वर्षीय महिलेनं दावा केला आहे की, दोनदा लस घेतल्यानंतरही त्यांना पहिला डोस (Vaccine) घेतल्याचं प्रमाणपत्र मिळालं आहे. त्यामुळे त्यांना त्रास सहन करावा लागत आहे.

सामाजिक कार्यकर्त्या, दीनम्मा ईपेन म्हणाल्या की, या त्रुटीमुळे कुठेही प्रवास करू शकत नाहीत. “मी पहिला डोस १५ मार्च रोजी कल्याणच्या रुक्मिणीबाई सिविक हॉस्पिटलमध्ये आणि दुसरा २८ एप्रिल रोजी भिवंडी निजामपूर महानगरपालिकेच्या (BMC) लसीकरण केंद्र नवी वस्तीमध्ये घेतला. तथापि, दुसऱ्या डोसनंतर मला मिळालेले प्रमाणपत्र प्रथम डोस दर्शवते. त्यामुळे मला रेल्वे लोकल पास किंवा ट्रॅव्हल पास मिळू शकत नाही.”

अॅपेन ऑनलाईन तपशील दुरुस्त करण्याचा प्रयत्न करत आहे आणि लसीकरण केंद्राला तो दुरुस्त करण्यासाठी भेट दिली होती, परंतु सगळं व्यर्थ ठरलं.

पालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यानं सांगितलं, “दुसऱ्या डोस दरम्यान केलेल्या प्रवेशात काही त्रुटी असू शकतात. आम्ही रेकॉर्ड तपासू आणि आवश्यक ते करू.”

असाच काहिसा प्रकार बदलापूरमध्ये देखील घडल्याचं समोर आलं आहे. बदलापूरमधील एका जोडप्यानं लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. पण त्यांनी तक्रार केली आहे की, त्यांच्या लसीकरण प्रमाणपत्रांमध्ये फक्त एक डोस पूर्ण झाल्याचा उल्लेख आहे. परिणामी, लोकल ट्रेनने प्रवास करण्यापासून वंचित असल्याचा दावा त्यांनी केला.

रजिया खुर्शीद हुसेन शेख (६५) आणि खुर्शीधुसेन अब्दुल्ला शेख (६५) या दाम्पत्याने २४ मार्च रोजी ठाण्याच्या एका खाजगी रुग्णालयात कोविशील्डचा पहिला डोस घेतला. त्यांनी दुसरा डोस कुळगाव बदलापूर नगरपरिषदेच्या (केबीएमसी) दुबे हॉस्पिटलमध्ये २० मे रोजी घेतला. तथापि, दुसऱ्या डोस नंतर, त्यांना प्रमाणपत्र मिळाले ज्यात त्यांचा पहिला डोस म्हणून लसीचा दुसरा डोस दर्शविला गेला.

“आता, माझ्याकडे दोन प्रमाणपत्रे आहेत जी लसीकरणाचा पहिला डोस दाखवतात. मी मे महिन्यापासून नागरी रुग्णालयाला अद्ययावत करण्यासाठी भेट देत आहे. मात्र, त्यांनी याबाबत काहीच केलं नाही. आता, पूर्ण लसीकरणानंतर लोकल ट्रेनमध्ये प्रवास करता येत असल्यानं, पूर्ण डोस घेतल्यानंतरही आम्ही यापासून वंचित आहोत, ”शेख म्हणाले.

“मला माझ्या मुलीच्या मुलुंडच्या ठिकाणी ट्रेननं प्रवास करायचा आहे. यापूर्वी मी रोडनं मलुंडला गेलो आहे. बदलापूर ते मुलुंडला चार तास लागले, ”शेख म्हणाले.


हेही वाचा

आरोग्य विभाग म्हणतो, तिसऱ्या लाटेत रुग्णसंख्या ६० लाखाच्या घरात जाऊ शकते

कोवीशील्डच्या दोन डोसमधील अंतर पालिका कमी करण्याच्या विचारात, पण...

पुढील बातमी
इतर बातम्या