Advertisement

कोवीशील्डच्या दोन डोसमधील अंतर पालिका कमी करण्याच्या विचारात, पण...

असं झाल्यास, दोन डोसमधील गॅप तिसऱ्यांदा बदलला जाईल.

कोवीशील्डच्या दोन डोसमधील अंतर पालिका कमी करण्याच्या विचारात, पण...
SHARES

कोव्हशील्डच्या दोन डोसमधील अंतर कमी करण्याचा विचार केला जात आहे. लसीकरणावर बनवलेल्या तांत्रिक अ‍ॅडवायजरी ग्रुप NTAGI मध्ये यावर चर्चा केली जाईल. असं झाल्यास, दोन डोसमधील गॅप तिसऱ्यांदा बदलला जाईल.

सध्या हे अंतर ८४ दिवसांचे आहे. देशात लसीकरणाच्या सुरुवातीला कोवीशील्डचे दोन्ही डोस ४-६ आठवड्यांच्या अंतरावर दिले जात होते. नंतर हे वाढवून ६-८ आठवडे करण्यात आले होते.

एका नवीन अहवालानुसार बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) कोविशील्ड लसीच्या दोन डोस मधील अंतर कमी करण्याची मागणी करत आहे. लोकसंख्येच्या मोठ्या भागाला अजून त्यांचा दुसरा डोस मिळालेला नाही. अंदाजानुसार २५ टक्क्यांपेक्षा कमी लोकांना लसीचा दुसरा डोस मिळाला आहे.

यामुळे प्रशासकिय संस्थेनं दोन डोसमधील अंतर कमी करण्यासाठी केंद्राची मदत घेतली आहे. तथापि, या चर्चेला अद्याप यश मिळालेलं नाही. तिसऱ्या कोविड -19 लाटेची भीती वाढत आहे हे लक्षात घेता, केंद्र सरकारनं सुचवलेले ८४ दिवसांचे अंतर कमी करण्याची मागणी केली जात आहे.

पहिला डोस घेणारे लोक सध्या लसीकरण साइटवर रांगेत उभे आहेत. यामुळे त्यांच्या दुसऱ्या डोसची वाट पाहणाऱ्यांना त्रास होत आहे. याला आळा घालण्यासाठी, पालिकेनं सार्वजनिक डोस केंद्रामध्ये सहापैकी किमान एक दिवस दुसऱ्या डोस प्राप्तकर्त्यांकडून वॉक-इनला परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे.

“दुसऱ्या डोसच्या लाभार्थ्यांना पुढे येण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. आम्ही फक्त त्यांच्यासाठी एक दिवस वाचवण्याचा विचार करत आहोत. यामुळे आम्हाला पूर्णपणे लसीकरण झालेल्या लोकांची संख्या वाढण्यास मदत होईल, ”अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकाणी म्हणाले.

मिड-डेच्या अहवालात असं म्हटलं आहे की, नागरी संस्थेनं दोन डोस दरम्यानच्या अंतरात घट करण्याबाबत केंद्राशी अनुमती मागितली आहे. लसींच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे त्याला अनुकूल प्रतिसाद मिळाला नाही.

दरम्यान, देशात ४६ हजार २८० नवीन कोरोना रुग्ण आढळले. ५६ दिवसांतील ही सर्वाधिक रुग्ण संख्या आहे. यापूर्वी १ जुलै रोजी ४६ हजार ७८१ प्रकरणं होती.

गेल्या २४ तासांत ३४ हजार २४२ संक्रमित रुग्ण बरे झाले आणि ६०५ जणांचा मृत्यू झाला. केरळमधील परिस्थिती पुन्हा गंभीर दिसत आहे. बुधवारी इथं ३१ हजार ४४५ बाधित आढळले आणि २० हजार २७१ बरे झाले. या दरम्यान, या साथीमुळे २१५ रुग्णांना आपला जीव गमवावा लागला.हेही वाचा

मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी १९५८ दिवसांवर

तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत टारगेटेड टेस्टींग, रोज ६ हजार चाचण्या

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा