Advertisement

मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी १९५८ दिवसांवर

मुंबईत बुधवारी कोरोनाचे नवीन ३४३ रुग्ण आढळले. तर २७२ रुग्ण बरे होऊन घरी परतले.

मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी १९५८ दिवसांवर
SHARES

मुंबईत कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आला आहे. असून रोज आढळणा-या रुग्णांची संख्या तीनशेच्या आत आली आहे. याचबरोबर सक्रीय रुग्णांची संख्याही कमी झाली आहे. मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधीही आता वाढून तब्बल १९५८ दिवसांवर पोहचला आहे.

मुंबईत पालिकेच्या प्रभावी उपाययोजना आणि राज्य सरकारच्या निर्बंधांमुळे कोरोना रुग्णसंख्या पूर्ण नियंत्रणात आली आहे. दरम्यान, कोरोनाची संभाव्य तिसर्‍या लाटेसाठी पालिका सज्ज झाली आहे. मुंबईत कोरोना चाचण्यांची संख्या वाढवली आहे. रोज ४० हजार चाचण्या केल्या जात आहेत. 

मुंबईत बुधवारी कोरोनाचे नवीन ३४३ रुग्ण आढळले. तर २७२ रुग्ण बरे होऊन घरी परतले. मुंबईत सक्रीय रुग्ण संख्या २८५५ वर आली आहे. रुग्ण कमी झाल्याने रुग्ण दुपटीचा कालावधीही दिवसेंदिवस वाढत आहे. 

राज्यात बुुधवारी ५  हजार ०३१ नवीन रुग्ण आढळले असून,४ हजार ३८० रूग्ण बरे झाले आहेत. तर २१६ रूग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत ६२,४७,४१४  रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९७.०४ टक्के एवढे झाले आहे. आता राज्यातील रूग्णांची एकूण संख्या ६४,३६,६८० झाली आहे. आतापर्यंत राज्यात १,३६,५७१ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा