Advertisement

तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत टारगेटेड टेस्टींग, रोज ६ हजार चाचण्या

दररोज संध्याकाळी सर्व वैद्यकीय अधिकारी आणि विभाग अधिकारी यांच्याशी वेबसंवादाव्दारे होणा-या बैठकीमध्ये महापालिका आयुक्तांकडून या सर्व गोष्टींचा आढावा अत्यंत बारकाईने घेतला जात असून त्यानुसार कोव्हीडची तिसरी लाट लांबविण्यासाठी नियोजन केले जात आहे

तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत टारगेटेड टेस्टींग, रोज ६ हजार चाचण्या
SHARES

अमेरिका, रशिया, जपान व इतर देशांतील कोरोनाची स्थिती पाहता तसेच साधारणत: सप्टेंबर महिन्यात तिस-या लाटेचा धोका जाणवणार असल्याची केंद्रीय निती आयोगाने व्यक्त केलेली शक्यता लक्षात घेता नवी मुंबई महापालिकेने तिस-या लाटेच्या पूर्वतयारी कामांना गती दिलेली आहे.

सध्या दररोजच्या रुग्णसंख्येत घट दिसत असल्याने अनेक ठिकाणी निर्बंध शिथील करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये आगामी सणांचा कालावधी लक्षात घेता तिसरी लाट येण्याचा धोका दिसत असून या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्याकडून आरोग्य सुविधांमध्ये करावयाच्या आवश्यक वाढीचा नियमित आढावा घेतला जात आहे. सध्या निर्बंध हटविण्यात आल्याने रुग्णवाढीची भीती लक्षात घेऊन आवश्यक खबरदारी घेण्याचे निर्देश आयुक्तांनी आढावा बैठकीत दिले आहेत.

 नवी मुंबई महापालिकेने टारगेटेड टेस्टींगवर भर दिला आहे. जास्तीत जास्त नागरिकांच्या चाचण्या केल्या जात आहेत. सध्या कोरोना बाधीतांची संख्या कमी असूनही दैनंदिन 6 हजारहून अधिक चाचण्या केल्या जात आहेत. कोरोना बाधीताच्या संपर्कातील व इमारतीमधील सर्व नागरिकांची चाचणी करण्यात येत आहे.

त्याचप्रमाणे लसींच्या उपलब्धतेनुसार अधिकाधिक नागरिकांचे लसीकरण होऊन ते संरक्षित व्हावेत याकडे विशेष लक्ष दिले जात आहे. दररोज संध्याकाळी सर्व वैद्यकीय अधिकारी आणि विभाग अधिकारी यांच्याशी वेबसंवादाव्दारे होणा-या बैठकीमध्ये महापालिका आयुक्तांकडून या सर्व गोष्टींचा आढावा अत्यंत बारकाईने घेतला जात असून त्यानुसार कोव्हीडची तिसरी लाट लांबविण्यासाठी नियोजन केले जात आहे

दुस-या लाटेत जाणवलेल्या ऑक्सिजन पुरवठ्याची कमतरता लक्षात घेऊन ऑक्सिजनसारख्या अतिशय महत्वाच्या विषयाकडे गांभीर्याने लक्ष दिले जात आहे. सद्यस्थितीत महानगरपालिकेकडे 20 टन क्षमतेचा ऑक्सिजन टॅँक आलेला असून आणखी 2 टॅंक 30 ऑगस्टपर्यंत येतील.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा