Advertisement

आरोग्य विभाग म्हणतो, तिसऱ्या लाटेत रुग्णसंख्या ६० लाखाच्या घरात जाऊ शकते

सार्वजनिक आरोग्य विभागाचे मूल्यांकन केंद्र सरकारनं जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांवर आधारित होते.

आरोग्य विभाग म्हणतो, तिसऱ्या लाटेत रुग्णसंख्या ६० लाखाच्या घरात जाऊ शकते
SHARES

महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागानं अंदाज लावला आहे की, सप्टेंबर-ऑक्टोबर २०२१ पर्यंत अपेक्षित असलेल्या तिसऱ्या लाटेदरम्यान राज्यात ६० लाख नवीन कोविड -19 प्रकरणं आढळू शकतात. सार्वजनिक आरोग्य विभागाचे मूल्यांकन केंद्र सरकारनं जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांवर आधारित होते.

विभागानं हेही स्पष्ट केलं की, राज्य सरकारनं सज्जतेच्या उपायांसाठी १२०० कोटींची तरतूद केली असली तरी त्यासाठी अतिरिक्त ४००० कोटींची आवश्यकता असेल. या प्रकरणाशी परिचित असलेल्या एका अधिकाऱ्याने सांगितलं की निधी डीपीडीसी, सीएसआर, एसडीआरएफ, एमपी आणि आमदार निधीतून वाटप केला जाईल.

मुख्य सचिवांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा सिव्हिल सर्जन आणि प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना पुढील लाटेचा सामना करण्याच्या योजनेबद्दल पत्र लिहिलं आहे.

आरोग्य विभागाच्या अंदाजानुसार, येत्या काळात १२.९५ लाख प्रकरणं दिसून येतील. यापैकी ८.६ लाख रुग्ण होम आयसोलेशनमध्ये राहण्याची अपेक्षा आहे तर ४.५ लाख रुग्णांना हॉस्पिटल आयसोलेशनची आवश्यकता असू शकते.

एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं स्पष्ट केलं की, "६५ टक्के होम आयसोलेशनमध्ये असतील. तर १७.५ खाजगी आरोग्य सुविधा आणि उर्वरित सार्वजनिक आरोग्य सुविधांमध्ये जातील."

राज्य कोविड टास्क फोर्सनं मुलांसाठी केंद्राच्या विशिष्ट मार्गदर्शक तत्त्वांशी सहमती दर्शवली आहे. या प्रस्तावाअंतर्गत, समर्पित कोविड रुग्णालयांमध्ये ५ टक्के बेड बालरोग रुग्णांसाठी राखीव आहेत. दरम्यान, समर्पित कोविड हेल्थकेअर सेंटरना लहान मुलांसाठी किमान १० टक्के बेड राखून ठेवावे लागतील तर कोविड केअर सेंटरला १५ टक्के बेड बाजूला ठेवावे लागतील.



हेही वाचा

कोवीशील्डच्या दोन डोसमधील अंतर पालिका कमी करण्याच्या विचारात, पण...

कोरोनासंदर्भातील कॉलर ट्यूनला वैतागलात? अशी करा बोलती बंद

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा