Advertisement

कोरोनासंदर्भातील कॉलर ट्यूनला वैतागलात? अशी करा बोलती बंद

आता अनेक जण या कॉलर ट्यूनला वैतागले आहेत. पण ही कॉलर ट्यून बंद करायची तरी कशी असा प्रश्न अनेकांना पडला आसेल. एका ट्रिकद्वारे ही ट्यून बंद करता येऊ शकते.

कोरोनासंदर्भातील कॉलर ट्यूनला वैतागलात? अशी करा बोलती बंद
SHARES

मागील दीड वर्षापासून कोरोनापासून बचाव करण्यासाठी सरकार अनेक उपक्रम राबवत आहे. त्यापैकीच एक उपक्रम म्हणजे लसीकरणाबाबत जमजागृती करणं. जनजागृती करण्यासाठी फोनवर कॉलर ट्यूनच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली जात आहे.

एखाद्याला फोन केल्यानंतर गेल्या दीड वर्षापासून कोरोनाची कॉलर ट्यून, लसीकरणाबाबतची कॉलर ट्यून ऐकू येते. काही दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील कॉलर ट्यूनही होती. ती काही दिवसांनी हटवण्यात आली.

पण आता अनेक जण या कॉलर ट्यूनला वैतागले आहेत. पण ही कॉलर ट्यून बंद करायची तरी कशी असा प्रश्न अनेकांना पडला आसेल. एका ट्रिकद्वारे ही ट्यून बंद करता येऊ शकते. चला तर जाणून घेऊयात.

बीएसएनएल (BSNL)

बीएसएनएल (BSNL) चे प्रीपेड आणि पोस्टपेड युजर्स कोरोना व्हायरस ट्यून मोबाईलवर बंद करू शकतात. त्यासाठी UNSUB टाईप करुन 56700 या किंवा 56799 वर मेसेज पाठवावा लागेल. त्यानंतर कन्फर्मेशन मेसेज येईल.

जिओ (Jio)

जिओ (Jio Users) युजर्स आपल्या फोनवरुन STOP लिहून 155223 वर मेसेज करु शकतात. कन्फर्मेशननंतर कॉलर ट्यून बंद होईल.

वोडाफोन (Vodafone)

व्होडाफोन वापरकर्त्यांना त्यांच्या संदेश बॉक्समध्ये CANCT टाइप करून 144 वर पाठवणं आवश्यक आहे.

एअरटेल (Airtel)

एअरटेलवर (Airtel) 144 वर CANCT टाईप करुन मेसेज पाठवून कॉलर ट्यून बंद करता येईल. त्यानंतर मोबाईलवर एक मेसेजही येईल.

दुसरी ट्रिक

एखाद्याला फोन करताना नंबर डायल करावा लागेल. त्यानंतर कोरोना व्हायरस अलर्ट मेसेजची सुरुवात होईल, त्यावेळी 1 प्रेस करावं लागेल. 1 प्रेस केल्यानंतर कॉलर ट्यून बंद होईल आणि नॉर्मल ट्यून ऐकू येईल.

गेल्या वर्षापासून सरकारनं हा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याचे आदेश दिले होते. यामुळे, कोरोनाविरूद्ध सतर्कतेची सूचना लोकांपर्यंत जाते. यामध्ये फेस मास्क, सामाजिक अंतर, खोकताना तोंडावर रुमाल ठेवणं अशा गोष्टींबाबत जनजागृती केली जाते.



हेही वाचा

कांदिवलीतल्या एकाच इमारतीत कोरोनाचे १७ रुग्ण, ५ डेल्टा प्लसचे रुग्ण

कोव्हॅक्सिनच्या मागणीत होतेय वाढ?

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा