Advertisement

कांदिवलीतल्या एकाच इमारतीत कोरोनाचे १७ रुग्ण, ५ डेल्टा प्लसचे रुग्ण

इमारतीत १७ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे सोसायटीला कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आलं आहे.

कांदिवलीतल्या एकाच इमारतीत कोरोनाचे १७ रुग्ण, ५ डेल्टा प्लसचे रुग्ण
(Representational Image)
SHARES

मुंबईतल्या कांदिवली परिसरातील एकाच इमारतीत कोरोनाचे १७ रुग्ण आढळून आले आहेत. कांदिवली पश्चिम इथल्या वीणा गीत संगीत गंगोत्री यमुनोत्री इमारतीत १७ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे सोसायटीला कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आलं आहे.

१७ पैकी १० रुग्ण बरे झाले आहेत आणि सात अजूनही उपचार घेत आहेत. त्यापैकी दोन रुग्णालयात आहेत. कांदिवलीतील रहिवाशांसाठी आणखी एक चिंता म्हणजे महापालिकेला पाच डेल्टा प्लसचे रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी चार पूर्व भागात आणि एक पश्चिम भागात आहेत.

वीणा गीत संगीत गंगोत्री यमुनोत्री सोसायटीचे सचिव हितेश महात्रे म्हणाले, “सोसायटीमध्ये १२५ सदस्य आहेत आणि आम्ही नियमितपणे स्वच्छता करतो आणि सर्व खबरदारी घेतो. सात रुग्णांपैकी दोन ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. गेल्या चार दिवसात एकही नवीन रुग्ण आढळलेला नाही. आम्ही ३५ लोकांच्या चाचण्या घेतल्या आणि एकही चाचणी पॉझिटिव्ह आली नाही. आमच्याकडे डेल्टा प्लसचा कोणताही रुग्ण नव्हता.”

आर दक्षिण प्रभागाच्या सहाय्यक महापालिका आयुक्त संध्या नांदेडकर म्हणाल्या, “शहरात हळूहळू प्रकरणं वाढत आहेत आणि तज्ज्ञांच्या मते पुढील महिन्यात तिसरी लाट येऊ शकते. लोकांनी कोरोनाला हलक्यात घेऊ नये. एकत्र जमा होणं टाळायला हवं. आम्ही आता कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर अधिक काम करत आहोत. आम्हाला १७ कोविड रुग्ण आढळल्यानंतर महावीर नगर इथल्या सोसायटीला कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आलं आहे.”

“आर दक्षिण प्रभागामध्ये पाच डेल्टा प्लस रुग्ण देखील आहेत. ज्या इमारतींमध्ये डेल्टा प्लसची प्रकरणं आढळली आहेत त्या सील करण्यात आल्या आहेत. आम्ही त्यांना दैनंदिन जीवनावश्यक वस्तू पुरवत आहोत,” असं नांदेडकर म्हणाल्या.

दरम्यान, मुंबईत कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता लक्षात घेऊन पालिका सज्ज झाली आहे. ही लाट रोखण्यासाठी मुंबईत पुन्हा सोडियम हायपोक्लोराइडची फवारणी करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे. आरोग्य केंद्रे, दवाखाने, सार्वजनिक शौचालये, झोपडपट्टय़ा, चाळी आणि अरुंद गल्ल्यांमध्ये फवारणी करून त्या निर्जंतूक करण्याचा निर्णय पालिकेनं घेतला आहे.



हेही वाचा

लहान मुलांनाही ऑक्टोबरपासून मिळणार कोरोना लस

मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी १९५८ दिवसांवर

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा