३४३ औषधांवर केंद्राची बंदी; सिप्ला, वोखार्डसह बड्या कंपन्यांना झटका

एकाच औषधात एकापेक्षा अधिक घटक (संयुगे) वापरून तयार करण्यात येणाऱ्या फिक्स डॉस कॉम्बिनेशन नावाने ओळखल्या जाणाऱ्या ३४३ औषधांवर अखेर केंद्र सरकारने बंदी घातली आहे. फिक्स डॉस कॉम्बिनेशन असलेली औषध आरोग्यास हानिकारक असल्याचं म्हणत केंद्राच्या आरोग्य विभागाच्या ड्रग्ज कंट्रोलर गव्हर्नर ऑफ इंडिया (डिसीजीआय) ने अखेर अशी ३४३ औषधे प्रतिबंधीत केली आहेत. सर्दी खोकल्यापासून ते मधुमेहावरील औषधांचा यात समावेश आहे. हा निर्णय सिप्ला, सन फार्मा, वोखार्ड सारख्या अनेक बडया कंपन्यासाठी मोठा झटका मनाला जात आहे.

रुग्णांसाठी हानीकारक

एकाच वेळी एकापेक्षा अधिक घटक वापरून तयार करण्यात येणाऱ्या फिक्स डॉस कॉम्बिनेशन औषधांचं प्रमाण बाजारात खूप वाढलं आहे. तर या औषधांचं सेवन रुग्णांच्या आरोग्यासाठी हानीकारक ठरत असल्याच्या अनेक तक्रारी डिसीजीआयकडे आल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत डिसीजीआयन दोन वर्षांपूर्वी अशा ३४३ फिक्स डॉस कॉम्बिनेशन असलेल्या औषधावर बंदी घातली. या निर्णयामुळे औषध निर्मितीतील बड्या कंपन्यांच्या पोटात गोळा आला. ६००० हून अधिक ब्रँड यामुळे बंद झाले. 

बंदी आणण्याची शिफारस 

या धर्तीवर औषध कंपन्यांनी या निर्णयविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानुसार न्यायालयाने दीड वर्षांपुर्वी या निर्णयाला स्थगित देत बंदी उठवली होती. त्यानंतर औषध कंपन्याच्या याचिकेवरील सुनावाणीवेळी डिसीजीआयने ही औषधं कशी आरोग्यासाठी हानीकारक आहेत हे दाखवून दिलं. तर न्यायालयाने या संदर्भातील निर्णय डिसीजीआयने घ्यावा असे निर्देश दिले. त्यानुसार डिसीजीआयच्या ड्रग टेक्निकल अॅडव्हायजरी बोर्डने फिक्स डॉस कॉम्बिनेशन असलेली ३४३ औषधं हानीकारक असल्याचं म्हणत त्यावर बंदी आणण्याची शिफारस केली होती. तेव्हाच ही औषधं प्रतिबंधीत होणार याचे स्पष्ट संकेत मिळाले होते.

निर्णयाचं स्वागत

या शिफारशीनुसार डिसीजीआयने अखेर या औषधांवर बंदी आणली आहे. त्यामुळे ही ३४३ औषधं आता उपलब्ध होणार नाहीत. औषध विक्रेते आणि फार्मासिस्ट संघटनांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे. रुग्णांच्या आरोग्यास घातक अशी ही औषधं बंद होणं गरजेचं होतं. या निर्णयामुळे रुग्णांना दिलासा मिळणार आहे. मात्र, अाता डॉक्टरांनी काळजी घेत जेनेरिक औषध लिहून द्यावीत अशी आशा यानिमित्ताने महाराष्ट्र रजिस्टर्ड  फार्मासिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष कैलास तांदळे यांनी व्यक्त केली आहे.


हेही वाचा -

देशभरातल्या औषध विक्रेत्यांचा २८ सप्टेंबरला बंद

सह्याजीराव पॅथाॅलाॅजिस्टच्या एमएमसी मुसक्या आवळणार; परिपत्रक जारी


पुढील बातमी
इतर बातम्या