कोरोनाविरोधात लढा देण्यास घरगुती उपाय किती प्रभावशाली?

देशभरात कोरोना व्हायरसचा धोका दिवसागणिक वाढतोच आहे. कोरोनासाठी अनेक जण घरगुती उपाय करत आहेत. यामुळे कोरोना बरा होईल असा अनेकांचा समज आहे. पण वैज्ञानिकदृष्ट्या हे अजून सिद्ध झालं नाही. पण घरगुती उपाय करून तुम्ही शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढवू शकता.

रोगप्रतिकारक शक्ती चांगली असेल तर कोरोनाशी लढा देता येतो. केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयानं रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काही घरगुती आणि सोप्या टिप्स दिल्या आहेत.

'हे' घरगुती  उपाय फायदेशीर

  • संपूर्ण दिवसभरात ज्या-ज्या वेळी पाणी प्याल त्यावेळी कोमट पाणी प्यावे

  • दररोज दिवसांतून कमीत कमी 30 मिनिटं तरी योगासनं, प्राणायम, ध्यान-धारणा आवश्यक करावी.
  • हळद, जीरं, धणे, लसून या पदार्थांचा जेवणात समावेश जरुर करा.
  • तुळशीपान, सुंठ, दालचिनी, काळीमिरी, हळद यामध्ये गूळ मिसळून केलेला काढा घाला.
  • पित्ताचा त्रास असलेल्यांनी दालचिनी, मिरे कमी प्रमाणात वापरावे.
  • उपाशी न राहता दोन वेळा घरचे सात्विक, पचायला हलके अन्न खावे.
  • घसा खवखवत असल्याचं लवंग गूळ एकत्र करून चघळावी.
  • दररोज एक चमचा च्यवनप्राश खाऊन दिवसाची सुरुवात करा. ज्यांना लोकांना मधुमेधाची समस्या आहे, त्या लोकांनी शुगर फ्री च्यवनप्राश खावं
  • हळद घातलेलं दूध पिणे.
  • तिळ किंवा नारळाचं तेल किंवा देशी तूपाचे दोन थेंब नाकपुड्यांमध्ये टाकावे.

घरगुती उपाय करताना 'ही' काळजी घ्या

  • काढे किंवा औषधे सांगितलेल्या ठराविक प्रमाणातच घ्यावीत.
  • काळी मिरी, हळद, आले, ओवा, मेथी, तुळस, लवंग यांसारखे आयुर्वेदात सांगितले मसाले हे तुमच्या शरीराला अति सेवनामुळे हानी पोहीचवू शकतात.
  • इंटरनेट वर आलेल्या कोणत्याही माहितीवर डोळे झाकून विश्वास ठेवू नये.
  • गळा सुकणे, गळ्यात वेदना होणे, कोरडा खोकला सुरु होणे, अपचन, छातीत जळजळ होणे, चिडचिड होणे, सारखा मूड बदलणे, लक्ष न लागणे यांसारख्या समस्या आयुर्वेदिक मसाल्यांच्या अतिसेवनाने दिसतात.

(वर दिलेल्या टीप्स डॉक्टरी सल्ल्यानं घ्याव्यात.)


हेही वाचा

कोरोनाची लक्षणं आहेत, पण RT-PCR चाचणी निगेटिव्ह आल्यास काय करावं?

कोरोना रूग्णांना येणाऱ्या अडचणींसाठी BMC च्या 'या' क्रमांकावर संपर्क साधा

पुढील बातमी
इतर बातम्या