Advertisement

कोरोनाची लक्षणं आहेत, पण RT-PCR चाचणी निगेटिव्ह आल्यास काय करावं?

अनेकदा रुग्णात लक्षणं असतात. पण RT-PCR चे रिपोर्ट निगेटिव्ह येतात. असं का होतं?या मागे नेमकी काय कारणं आहेत? जाणून घेऊयात.

कोरोनाची लक्षणं आहेत, पण RT-PCR चाचणी निगेटिव्ह आल्यास काय करावं?
SHARES

कोरोना संसर्गाची प्रमुख लक्षणं म्हणजे ताप, सर्दी, खोकला, कफ, अंगदुखी, खूप थकवा आणि जुलाब आहेत. लक्षणं दिसून येताच, डॉक्टर तातडीनं टेस्ट करण्यास सांगतात. RT-PCR चाचणी द्वारे कोरोना झाला आहे की नाही याचं निदान केलं जातं.

पण अनेकदा रुग्णात लक्षणं असतात. पण RT-PCR चे रिपोर्ट निगेटिव्ह येतात. असं का होतं?या मागे नेमकी काय कारणं आहेत? जाणून घेऊयात.

RT-PCR टेस्ट म्हणजे काय?

RT-PCR म्हणजे Real Time Reverse Transcription Polymerase Chain Reaction. सामान्य भाषेत याला 'स्वॅब टेस्ट' म्हणतात. या टेस्टमध्ये नाकातून किंवा घशातून स्वॅब (नमुना) घेतला जातो.

कशी केली जाते टेस्ट?

तज्ज्ञांच्या मते, रुग्णाच्या नाकातून किंवा घशातून नमुना घेतल्यानंतर, कॉटनस्वॉब द्रव पदार्थ असलेल्या ट्यूबमध्ये मिसळला जातो. या ट्यूबमध्ये असलेल्या द्रव पदार्थात कॉटनवर असलेला व्हायरस मिसळतो आणि जिवंत राहतो. त्यानंतर हा नमुना प्रयोगशाळेत तपासणीसाठी नेला जातो.

‘या’मुळे रिपोर्ट निगेटिव्ह येतात

  • व्हायरसला जिवंत ठेवण्यासाठी द्रवपदार्थ योग्य प्रमाणात न वापरल्यास
  • स्वॅबची वाहतूक करताना, व्हायरस सामान्य तापमानात राहिला तर खराब होतो. त्यामुळे लक्षणं असूनही टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह येत नाहीत.
  • काहीवेळा स्वॅब घेण्यासाठी जाणारे लोकांना योग्य प्रशिक्षण नसतं. हे देखील टेस्ट निगेटिव्ह येण्याचं एक कारण आहे.
  • योग्य पद्धतीनं रुग्णाचा स्वॅब घेण्यात न येणं
  • स्वॅबच्या नमुन्यांची योग्य वाहतूक न झाल्यामुळे
  • कोव्हिड-19 टेस्ट करण्याआधी रुग्णानं पाणी प्यायले किंवा काही खाल्ले असेल तर याचा परिणाम पीसीआर टेस्टवर होण्याची शक्यता असते.
  • कोरोना हा एकप्रकारचा RNA व्हायरस आहे जो लवकर म्युटेट होतो. टेस्टमध्ये जो भाग आपण तपासणार आहोत. त्यात बदल झाला तर परिणाम वेगळे येतात.
  • लक्षणं असूनही RT-PCR निगेटिव्ह आली आणि लक्षणं कायम असतील तर रुग्णांनी पहिली चाचणी केल्यानंतर ५ ते ६ दिवसांनी पुन्हा RT-PCR टेस्ट करून घ्यावी.हेही वाचा

कोरोनाच्या रुग्णानं कधी रुग्णालयात दाखल व्हावं? कोणी घरी उपचार करावेत? जाणून घ्या

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा