Advertisement

कोरोनाच्या रुग्णानं कधी रुग्णालयात दाखल व्हावं? कोणी घरी उपचार करावेत? जाणून घ्या

कोरोना रूग्णाला रूग्णालयात कधी दाखल करावे आणि त्याला ऑक्सिजन, रेमडिसिवीर इत्यादीची गरज कधी पडू शकेत? याची माहिती देणार आहोत.

कोरोनाच्या रुग्णानं कधी रुग्णालयात दाखल व्हावं? कोणी घरी उपचार करावेत? जाणून घ्या
SHARES

तुमचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असेल तर घाबरून जाण्याची गरज नाही. तज्ज्ञांचे मते कोरोनाची लागण झालेल्या प्रत्येक रुग्णाला रुग्णालयात जाण्याची आवश्यकता नसते, जवळजवळ ९० टक्के रुग्णांवर होम आयसोलेशनमध्ये उपचार केले जाऊ शकतात.

आज आम्ही रूग्णाला रूग्णालयात कधी दाखल करावे आणि त्याला ऑक्सिजन, रेमडिसिवीर इत्यादीची गरज कधी पडू शकेत? याची माहिती देणार आहोत.

१) घरात क्वारंटाईन कधी करावे?

 • जेव्हा तुम्ही एखाद्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात येता. पण तुमच्यात कोणतीही लक्षणं नाहीत. तेव्हा स्वत:ला आयसोलेट करून घेणं योग्य ठरेलं.
 • कोरोना रुग्णाच्या संपर्कात न येताही तुम्हाला ताप, घसा दुखणे, थकवा, अशक्तपणा, अंगदुखी अशी लक्षणे असतील तर स्वतःला आयसोलेट करा.
 • त्यानंतर स्वत:ची कोविड टेस्ट करून घ्या.
 • तुमचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असल्यास आणि तुमची ऑक्सिजनची पातळी ९३ हून अधिक असल्यास तुम्ही होम आयसोलेशनमध्ये बरे होऊ शकता.

२) रुग्णालयात कधी दाखल व्हावे?

 • श्वास घेण्यास त्रास होत असेल किंवा दम लागत असेल.
 • शरीरातील ऑक्सिजनची पातळी ९५ वरुन घसरुन ९० वर आली असेल
 • तुमचे वय ६० वर्षांहून अधिक असेल आणि तुम्हाला इतर काही आजार असेल
 • रुग्णालयात दाखल होण्याचा अर्थ तुम्हाला थेट ऑक्सिजन किंवा व्हेंटिलेटरची गरज पडतेय, असा नाही. या सर्व परिस्थितीत तुमच्यावर आयसीयू आणि व्हेंटिलेटरविना उपचार होऊ शकतात.

३) ICU किंवा व्हेंटिलेटरची गरज कधी भासते?

 • जेव्हा तुमच्या फुफ्फुसांना ५० टक्क्यांहून अधिक संसर्ग झाला असेल.
 • शरीरातील ऑक्सिजनची पातळी घसरुन ९० हून कमी झाली असेल.
 • रेमडिसिवीरची गरज आहे की नाही हे डॉक्टर ठरवतात.

४) हे करु नका

 • कोरोनाची लागण झाल्यानंतर शरीरासोबतच मन शांत ठेवणं गरजेचं आहे. कोणत्याही प्रकारचा ताण घेऊ नका.
 • मोबाइल आणि कोरोनापासून दूर राहण्याचा सल्ला यासाठी की यामुळे तुम्ही कोरोनाशी संबंधित बातम्यांपासून दूर राहू शकता.
 • आपली ऑक्सिजनची पातळी वारंवार तपासू नका, असं केल्यानं मानसिक ताण निर्माण होतो.
 • कोरोनावर यशस्वी मात करण्यासाठी शारीरिक आरोग्यासह मानसिक आरोग्यदेखील निरोगी असणे गरजेचे असते.हेही वाचा

कोरोना रुग्णांनी घरच्या घरी 'अशी' घ्या काळजी

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा