कोरोनाची लक्षणं नसलेल्या आणि सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णांना 'होम क्वारंटाईन' म्हणजेच घरात विलगीकरण करून घेण्याची परवानगी आहे.
अति सौम्य लक्षणं आढळणाऱ्या वा लक्षणं नसणाऱ्या रुग्णांना जर त्यांच्या घरी आवश्यक त्या सुविधा असतील - म्हणजे वेगळी खोली, स्वतंत्र टॉयलेट तर घरीच विलगीकरणाचा पर्याय आहे. होम क्वारंटाईन (Home quarantine) झाल्यावर काय काळजी घ्यायची?हे आज आम्ही सांगणार आहोत.
- घरातल्या ज्येष्ठ नागरिकांपासून, गर्भवती महिलांपासून, लहान मुलं आणि इतर व्याधी असणाऱ्या व्यक्तींपासून दूर रहा.
- वैयक्तिक हायजीन - स्वच्छता पाळा, आणि औषधं वेळेवर घ्या. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही औषधं घेऊ नका.
- घरातला तुमचा वावर मर्यादित ठेवा. घरात वावरताना मास्क वापरा. मास्क व्यवस्थित घाला.
- चुकूनही लोकांमध्ये मिसळू नका, घराबाहेर पडू नका.
- रुग्णाच्या वापराच्या सगळ्या गोष्टी वेगळ्या असाव्यात. अगदी त्यांचं जेवणाचं ताट - पेलाही वेगळा ठेवा.
- रुग्णाचे कपडे, ताटं-पेले-कप, बेडशीट्स, टॉवेल वेगळे धुवा.
- रुग्णाला जेवण देताना, खोली स्वच्छ करताना मास्क आणि ग्लोव्हज वापरा. एका वापरानंतर त्याची योग्य विल्हेवाट लावा.
- कुटुंबातल्या एकाच व्यक्तीनं रुग्णाची काळजी घ्यावी. जो व्यक्ती काळजी घेत असेल त्याला आधीपासून कुठले आजार नसावेत.
- रुग्णाला सौम्य लक्षणं आढळत असतील, तर लक्षणं वाढतायत का, यावर लक्ष ठेवावे.
- रुग्ण असणारी खोली दररोज १% सोडियम हायपोक्लोराईटच्या सोल्यूशननं साफ करावी, टॉयलेट आणि इतर पृष्ठभाग ब्लीचच्या सोल्यूशननं साफ करावेत.
'या' गोष्टी आढळल्यास डॉक्टरांना संपर्क करावा
- पल्स ऑक्सिमीटर बोटाला लावून शरीरातली ऑक्सिजनची पातळी तपासण्याचं यंत्र जर ९५ पेक्षा कमी पातळी दाखवत असल्यास
- २४ तास १००.४० फॅरहाईट (३८ C) पेक्षा जास्त ताप
- ६ मिनिटं चालल्यानंतर थकवा येणं
- छातीत सतत दुखणं वा दडपण आल्यासारखं वाटणं
- चेहरा किंवा हाता-पायाच्या संवेदना जाणं
- गोंधळल्यासारखं वाटणं, बोलताना त्रास होणं
- चेहरा किंवा ओठांवर निळे चट्टे
हेही वाचा