Advertisement

कोरोनाशी लढा, घरातील प्रथमोपचार पेटीत 'हे' साहित्य हवेच

कोरोना काळात वैद्यकीय दृष्ट्या आवश्यक असणारं साहित्य घरात असणं फार गरजेचं आहे.

कोरोनाशी लढा, घरातील प्रथमोपचार पेटीत 'हे' साहित्य हवेच
SHARES

कोरोना काळात वैद्यकीयदृष्ट्या तुमच्या घरी कोणत्या गोष्टी असणं गरजेचं आहे? घरच्याघरी मदत होणाऱ्या बाबी कोणत्या आहेत? डॉक्टर्स त्याविषयी काय सांगतात? अशी सगळी माहिती आपण पाहणार आहोत.

कोरोना काळात वैद्यकीय दृष्ट्या आवश्यक असणारं साहित्य घरात असणं फार गरजेचं आहे. आज आम्ही तुम्हाला प्रथमोपचार पेटीत कुठलं साहित्य असणं आवश्यक आहे? हे सांगणार आहोत.

१) मास्क (Mask)

केंद्र आणि राज्य सरकारकडून तोंडावर मास्क लावण्यासंदर्भात नियम जारी करण्यात आला आहे. म्हणून तुमच्या प्रथमोपचार पेटीत १० ते १५ मास्क असणं आवश्यक आहे. सध्या मास्कच्या किंमती कमी झाल्या आहेत. साधे सर्जिकल मास्क ५ रुपयाला उपलब्ध होतात.

२) थर्मामीटर 

कोरोनाच्या प्रमुख लक्षणांपैकी एक लक्षण म्हणजे ताप. थर्मामीटरमुळे तुम्हाला घरच्या घरी ताप मोजता येईल.

३) पल्स ऑक्सीमिटर

कोरोनाची लागण झाल्यानंतर अनेक रुग्णांची ऑक्सिजन पातळी कमी कमी होते. त्यांनी हॉस्पिटल किंवा घरी ऑक्सिजन द्यावा लागतो. पल्स ऑक्सिमिटरमध्ये बोटाच्या सहाय्याने शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण कळते. शरीरात ऑक्सिजनची सामान्य पातळी ही ९५ ते १०० टक्के या दरम्यान असायला हवी.

४) व्हिटॅमिन सी, ZINC (झिंक) आणि व्हिटॅमिन डी

आपल्या प्रथमोपचार पेटीत ही तिन्ही व्हिटॅमिन असणे आवश्यक आहे. व्हिटॅमिन सी, डी आणि झिंक याचे मिश्रण असलेली गोळी मेडिकलमध्ये उपलब्ध आहे. पण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ती घेता येईल.

५) सॅनिटायजर / हँड वॉश/ साबण

वेळोवेळी हात स्वच्छ धुतल्यानं हातावर असलेले विषाणू नष्ट होतात. त्यासाठी घाईघाईनं हात न धुता काही सेकंद वेळ देऊन हात धुतले पाहिजेत असा सल्ला डॉक्टर देतात.

६) व्हेपोरायझर किंवा गरम पाण्याची वाफ

सर्दी,खोकला असल्यास हमखास गरम पाण्याची वाफ घेण्याचा सल्ला देतात. त्यामुळे नाक आणि गळ्यातील म्युकस पातळ होते आणि रुग्णाला आराम मिळतो.



हेही वाचा

मुंबईतील 'हे' ७ विभाग कोरोनाचे हॉटस्पॉट

अ‍ॅक्टिव्ह रुग्णांमध्ये महाराष्ट्र जगात ७ व्या क्रमांकावर

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा