Advertisement

अ‍ॅक्टिव्ह रुग्णांमध्ये महाराष्ट्र जगात ७ व्या क्रमांकावर

राज्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. ही वाढती रुग्णसंख्या आता चिंताजनक बनली आहे. याचा आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण येत आहे.

अ‍ॅक्टिव्ह रुग्णांमध्ये महाराष्ट्र जगात ७ व्या क्रमांकावर
SHARES

राज्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. ही वाढती रुग्णसंख्या आता चिंताजनक बनली आहे. याचा आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण येत आहे. देशात सर्वाधिक कोरोना रुग्णांची संख्या महाराष्ट्रात आहे. तर रोजचा वाढीचा सर्वाधिक आकडाही महाराष्ट्रातच आहे.

धक्कादायक म्हणजे अ‍ॅक्टिव्ह रुग्णांच्या बाबतीत महाराष्ट्र जगात ७ व्या क्रमांकावर आहे. राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ५ लाख २१ हजार ३१७ आहे. सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या अमेरिकेत आहेत.

राज्यात गुुरुवारी ५६ हजार २८६ नवीन रुग्ण आढळले आहेत. तर ३७६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  गुरूवारी ३६ हजार १३० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर आतापर्यंत २६ लाख ४९ हजार ७५७ रुग्ण बरे झाले आहेत.  राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८२.०५ टक्क्यांवर आलं आहे. 

राज्यात पुणे जिल्ह्यात सर्वाधिक ९७ हजार २४२ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. मुंबई पालिका हद्दीत हा आकडा ८३ हजार ६९३, ठाणे जिल्ह्यात  ६९ हजार ९९३, नागपूर जिल्ह्यात ६१ हजार ७११ तर नाशिकमध्ये ३४ हजार ९१९ इतका आहे.

औरंगाबादमध्ये १८ हजार ८२, अहमदनगरमध्ये १५ हजार २९२, नांदेडमध्ये ११ हजार ६५९,जळगावमध्ये ८ हजार २१२, रायगडमध्ये  ७ हजार ५६३,  अमरावतीत ३ हजार ८४७, कोल्हापुरात १ हजार ५६१, सिंधुदुर्ग जिल्ह्यात ८८५ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. 



हेही वाचा -

कोरोना निर्बंधांविरोधात हॉटेलचालकांचं राज्यव्यापी आंदोलन

दुकानं सुरू करण्याचा निर्णय ३ दिवस लांबणीवर

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा