Advertisement

मुंबईतल्या 'या' रुग्णालयांमध्ये कोरोना लसींचा साठा संपला

शुक्रवार म्हणजेच ९ एप्रिलपासून अनेक लसीकरण केंद्रावर लस उपब्लध नसणार आहे, असंच चित्र आहे.

मुंबईतल्या 'या' रुग्णालयांमध्ये कोरोना लसींचा साठा संपला
SHARES

राज्यातील इतर ठिकाणांसोबतच आता मुंबईतील महत्त्वाच्या लसीकरण केंद्रावरील कोरोना लस संपलीय. अनेक लसीकरण केंद्रावर शून्य लसीचा साठा आहे. त्यामुळे शुक्रवार म्हणजेच ९ एप्रिलपासून अनेक लसीकरण केंद्रावर लस उपब्लध नसणार आहे, असंच चित्र आहे. मुंबई महापालिकेचे सहाय्यक आयुक्त किरण दिहगावकर यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे. ट्विटमध्ये त्यांनी कोरोना लस संपलेल्या लसीकरण केंद्रांची माहिती दिली.

ट्विटनुसार मुंबईतील वांद्रे बीकेसी कोविड सेंटर, सायन रूग्णालय, सेव्हन हिल हॉस्पिटल, कस्तुरभा रूग्णालय, कूपर हॉस्पिटल, सर्वादय रूग्णालय माहिम, पोदार रूग्णालय, क्रांती सावित्राबाई फुले रूग्णालय याठिकाणी लस उपब्लध नसणार आहे.

राज्यात कालपासून अनेक भागात कोरोना लसीचा तुटवडा भासतोय. सातारा, सांगली, कोल्हापूर, पनवेलमध्ये लसीअभावी कोरोना लसीकरण केंद्र बंद ठेवण्याची नामुष्की ओढावली आहे. 

तर पुण्यातही काही लसीकरण केंद्रावर लसीचा साठा संपल्यामुळे अनेक नागरिकांना लस न घेताच परतावं लागल्याचा दावा राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलाय. पिंपरी-चिंचवडमधील लसीकरण केंद्रांवरही आज पुरेल इतकाच कोरोना लसीचा साठा शिल्लक होता.

आरोग्यमंत्री राजेश टोपे (rajesh tope) यांनी गुरूवारी पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रातील लशींच्या पुरवठ्याची स्थिती सांगितली. ताज्या रिलीज ऑर्डरनुसार, राज्याला एका आठवड्यासाठी केंद्राकडून फक्त ७.५ लाख लसीचे डोस मिळाले आहेत. तर उत्तर प्रदेश ४८ लाख, मध्य प्रदेश ४० लाख, गुजरातला ३० लाख, हरियाणाला २४ लाख अशा पद्धतीने लशीचं वाटप झालं आहे.

लसीकेंद्र वाढवूनही जर लसच उपलब्ध नसेल, तर देणार कशी? देशभरात ५० टक्के रुग्ण असणाऱ्या राज्याला ७.५ लाख आणि इतरांना जास्त डोस का? आम्ही सगळ्या प्रकारे लसींची मागणी केली आहे.

महाराष्ट्रात आठवड्याला ४० लाख लसीचे डोस लागतातच. त्यामुळे महिन्याला १ कोटी ६० लाख डोस मिळायला हवेत. तरच राज्यातली लसीकरण मोहीम व्यवस्थित सुरू राहू शकेल, असं देखील टोपे यांनी स्पष्ट केलं.



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा