Advertisement

१८ वर्षांवरील नागरिकांनी लस घेण्यासाठी 'या' तारखेपासून अशी करा नोंदणी

जाणून घ्या, १८ वर्षांवरील लोकांना लस घेण्यासाठी कुठल्या तारखेपासून आणि कुठं नाव नोंदवावं लागेल?

SHARES

भारतातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन, १ मे २०२१ पासून १८ वर्षे वयाच्या वरील सर्वांचं लसीकरण सुरू करण्यात येणार आहे. यासाठीची नोंदणी शनिवार २४ एप्रिलपासून करता येईल. पाहूया की, १८ वर्षांवरील लोकांना लस घेण्यासाठी कुठल्या तारखेपासून आणि कुठं नाव नोंदवावं लागेल?


कोविन (Co-WIN) अॅप काय आहे?

कोविन (Co-WIN) हे अॅप म्हणजे कोव्हिड 19 साठीची लसीकरण मोहीम राबवण्यासाठीचा डिजीटल प्लॅटफॉर्म आहे. हे मोबाईल अॅप लसीकरणाविषयीची आकडेवारीही नोंदवेल. यासोबतच सगळ्या राज्यातील आणि केंद्रशासित प्रदेशातील आरोग्य कर्मचाऱ्यांचा एक डेटाबेसही हे अॅप तयार करेल.


कसं करायचं डाऊनलोड?

कोविन (Co-WIN) अॅप डाऊनलोडसाठी अॅप स्टोअरमध्ये उपलब्ध आहे. आपण डाऊनलोड करत असलेलं अॅप हे भारत सरकारनं आणलेलं अॅपच आहे ना, याची खात्री करून मगच ते डाऊनलोड करा. अधिकृत वेबसाईटवर कोविनचं पूर्ण नाव लिहण्यात आलंय Co-WIN : Winning over COVID 19.


लसीसाठी नोंदणी कशी करायची?

 • नोंदणीसाठी https://www.cowin.gov.in/home या वेबसाईटवर जा.
 • वेबसाईट उघडल्यानंतर तुम्हाला 'Find Your Nearest Vaccination Center' हा पर्याय दिसेल. यावरील Registration Yourself या पर्यायावर क्लिक करा.
 • त्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर विचारला जाईल आणि त्यावर OTP येईल. तो OTP टाकल्यानंतर नवीन विंडो उघडेल.
 • Register for Vaccination ची विंडो दिसेल. त्यात फोटो आयडी प्रूफ, फोटो आयडी नंबर, नाव, जन्मतारीख, लिंग आणि सहव्याधी इत्यादी माहिती इथं भरावी लागेल. त्यानंतर Register पर्यायावर क्लिक करा. तुम्हाला अकाऊंट डिटेल्स दिसतील.
 • एका मोबाईल नंबरच्या नोंदणीत तुम्हाला तीन जणांसाठी लसीकरणाची नोंद करता येऊ शकते. त्यासाठी Add या पर्यायावर क्लिक करून पुढील नावं आणि त्यांची माहिती समाविष्ट करता येईल. एखादं नाव डिलिट करण्याचाही पर्याय देण्यात आला आहे.
 • या अकाऊंट डिटेल्सच्या पानावरच युजर लसीकरणाची तारीख देऊ शकतात.
 • नंतर तुम्ही लसीकरण केंद्रासाठीही संपूर्ण माहिती भरू शकता. राज्य, जिल्हा, ब्लॉक आणि पिन कोड अशी माहिती दिल्यानंतर सर्च पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला लसीकरण केंद्रांची यादी दिसेल.
 • तुम्हाला जवळ असलेल्या केंद्रावर क्लिक केल्यानंतर उपलब्ध वेळ सांगितली जाईल. तिथं Book पर्यायावर क्लिक केल्यानंतर Appointment Confirmation चं पान उघडेल. Confirm केलंत की नोंदणी झाली.


या कागदपत्रांची आवश्यक्ता?

१) नोंदणी करण्यासाठी फोटो असणारं ओळखपत्रं असणं आवश्यक असेल. स्वतःची नोंदणी करताना इलेक्ट्रॉनिक KYC साठी ओळखपत्रं स्कॅन करून जोडावं लागेल. यासाठी १२ ओळखपत्रांचा पर्याय देण्यात आलेला आहे.

२) नोंदणी करताना जे ओळखपत्रं वापरण्यात आलेलं आहे, तेच ओळखपत्र लस घेण्यासाठी जाताना दाखवावं लागेल.

 • मतदार ओळखपत्र
 • आधार कार्ड
 • ड्रायव्हिंग लायसन्स
 • पॅन कार्ड
 • मनरेगा रोजगार कार्ड
 • बँक किंवा पोस्ट ऑफिसचं पासबुक
 • पासबुक
 • पेन्शनची कागदपत्रंहेही वाचा

सधन वर्गाने कोरोना लस विकतच घ्यावी, आरोग्यमंत्री राजेश टोपेंचं आवाहन

नाशिक ऑक्सिजन लिकेज : ठेकेदारानं निकृष्ट काम केल्याचा ठपका, २१ दिवसातच पाईप तुटला

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा