घराजवळील कोव्हिड सेंटर कसं आणि कुठं शोधायचं? जाणून घ्या

सध्या लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू असून त्यासाठी नागरिकांना आपल्या नावाची नोंदणी करण्याचे सांगितले जात आहे. मात्र अनेकांना कोरोना लस घेण्यासाठी जवळचे लसीकरण केंद्र कोणते आहे? याची माहिती मिळण्यास मोठ्या अडचणी येत आहेत. त्यामुळे जाणून घेऊयात आपल्या जवळचे लसीकरण केंद्र नेमके कसे शोधावे.

लसीकरण केंद्र कसं शोधाल?

१) कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी लसीकरण केंद्र शोधायचं असेल तर केंद्र सरकारनं दोन उपाय उपलब्ध करुन दिले आहेत. 

२) पहिली आहे https://www.cowin.gov.in/home आणि दुसरं आहे आरोग्य सेतू अॅप

३) पहिल्या संकेतस्थळावर लसीकरणाच्या संबंधित नंबर, लसीकरणाचे ठिकाण या सर्व गोष्टींची माहिती देण्यात आली आहे. याशिवाय या पोर्टलवर जाऊन कोरोना लस घेण्यासाठी नोंदणी करता येते.

४) त्यासाठी नागरिकांना आपला मोबाईल नंबर, त्यानंतर आधार कार्ड किंवा कोणतेही ओळपत्र लागेल. या ओळखपत्राचा नंबर टाकून नागरिकांना लसीकरणासाठी त्यांचे रजिस्ट्रेशन करता येईल.

५) पहिल्या संकेतस्थळी म्हणजे https://www.cowin.gov.in/home  या पोर्टलवर एक मॅप दिसेल. तसंच बाजूला सर्च ऑप्शनसुद्धा दिसेल. या सर्च ऑप्शनमध्ये गाव, शहर, जिल्हा तसेच राज्याचे नाव टाकून कोरोना लसीकरण केंद्र शोधता येऊ शकते.

६) आरोग्य सेतू अ‌ॅपवरसुद्धा कोरोना लसीकरण केंद्र शोधता येईल.

७) या अ‌ॅपवरसुद्धा कोरोना लसीकरण केंद्रांची माहिती दिलेली आहे. प्रत्येक जिल्हा, राज्य, नगर पंचायत यांच्या वेबसाईट्स तसेच सोशल मीडिया अकाऊंट यावरसुद्धा कोरोना लसीकरण केंद्राची माहिती देण्यात आली आहे.


हेही वाचा

मुंबईतील सर्व २२७ वाॅर्डांत उभारावीत लसीकरण केंद्र, आदित्य ठाकरेंची सूचना

१८ वर्षांवरील नागरिकांनी लस घेण्यासाठी 'या' तारखेपासून अशी करा नोंदणी

पुढील बातमी
इतर बातम्या