नवी मुंबईत होणार जम्बो लसीकरण केंद्र

अनेक खासगी व पालिकेच्या रुग्णालयांत नागरिकांना कोरोनाची लस दिली जात आहे. अशातच या सुविधेचा तुटवडा पडू नये सर्वाधिक नागरिकांना लस मिळावी यासाठी जम्बो कोरोना केंद्र सुरू करण्यात आले आहेत. अशातच आता नवी मुंबईतही एक्सपोर्ट हाऊस इथं जम्बो लसीकरण सुविधा सुरू करण्यात येणार आहे.

'एप्रिलच्या अखेरीस वयोवृद्ध व्यक्तींच्या समूहातील मोठ्या लोकसंख्येसाठी अधिक केंद्रं आवश्यक आहेत', असं नवी मुंबई महापालिकेचे प्रमुख अभिजित बांगर यांनी म्हटलं. मुंबईसह आसपासच्या परिसरातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशातच वाढत्या कोरोनाला आळा घालण्यासाठी राज्य सरकारनं राज्यभरात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरूवात केली आहे.

मुंबईत बुधवारी २,३७७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. ८ जणांचा मृत्यू झाला आहे. रुग्णदुपटीचा कालावधीही १४५ दिवसांपर्यंत खाली आला आहे. तर कोरोनामुक्त रुग्णांचा दर आणखी घसरून ९२ टक्क्यांवर आला आहे. मुंबईत एकूण बाधितांची संख्या ३ लाख ४९ हजार ९५८ झाली आहे. तर मृतांची संख्या ११ हजार ५४७ वर गेली आहे. एका दिवसात ८७६ रुग्ण बरे झाल्यामुळं आतापर्यंत ३ लाख २० हजार ७५४ म्हणजेच ९२ टक्के रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.


हेही वाचा -

मुंबईत २३७७ नवे रुग्ण; कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला

मुंबईत लॉकडाऊन नाही, कडक निर्बंध लावणार - अस्लम शेख


पुढील बातमी
इतर बातम्या