Advertisement

मुंबईत २३७७ नवे रुग्ण; कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला

मुंबईत कोरोनाची दुसरी लाट आली असून, रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे.

मुंबईत २३७७ नवे रुग्ण; कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला
SHARES

मुंबईत कोरोनाची दुसरी लाट आली असून, रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. मुंबईत बुधवारी २,३७७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. ८ जणांचा मृत्यू झाला आहे. रुग्णदुपटीचा कालावधीही १४५ दिवसांपर्यंत खाली आला आहे. तर कोरोनामुक्त रुग्णांचा दर आणखी घसरून ९२ टक्क्यांवर आला आहे.

मुंबईत एकूण बाधितांची संख्या ३ लाख ४९ हजार ९५८ झाली आहे. तर मृतांची संख्या ११ हजार ५४७ वर गेली आहे. एका दिवसात ८७६ रुग्ण बरे झाल्यामुळं आतापर्यंत ३ लाख २० हजार ७५४ म्हणजेच ९२ टक्के रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. फेब्रुवारीमध्ये कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ९४ टक्क्यांवर होती, आता हा दरही कमी झाला आहे.

सध्या शहरात १६ हजार ७५१ रुग्ण उपचाराधीन आहेत. त्यापैकी गंभीर रुग्णांची संख्या ४२६ आहे. मंगळवारी २१ हजार ५०० चाचण्या करण्यात आल्या. एकूण चाचण्यांपैकी बारा टक्क्यांहून अधिक अहवाल बाधित आले आहेत. रुग्णवाढीचा दर रोज वाढत असून तो ०.४८ टक्के झाला आहे.हेही वाचा -

कोरोनाची दुसरी लाट रोखायला हवी, पंतप्रधानांचे राज्यांना निर्देश

सरकारी ड्रेस कोडमध्ये बदल, जीन्स चालेल पण टी-शर्ट नाही


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा