Advertisement

मुंबईत लॉकडाऊन नाही, कडक निर्बंध लावणार - अस्लम शेख

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

मुंबईत लॉकडाऊन नाही, कडक निर्बंध लावणार - अस्लम शेख
SHARES

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मुंबईतील (Mumbai) स्थिती अद्याप बिकट नाही. मात्र, अजूनही कठोर निर्बंध लावून आपण लॉकडाऊनपासून दूर राहू शकतो, असं मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख (Aslam Shaikh) यांनी स्पष्ट केलं. मालाड येथील एका रुग्णालयाला बुधवारी अस्लम शेख यांनी भेट देऊन तेथील ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणाचा आढावा घेतला.

'मुंबईसह राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. मंगळवारची आकडेवारी पाहिली तर दिवसाला जवळपास २ हजार नवे कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. तरीही स्थिती बिकट आहे, असं म्हणता येणार नाही. पण कठोर निर्बंधांची आवश्यकता आहे', असं प्रसार माध्यमांशी बोलताना मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी म्हटलं.

'मुंबईची स्थिती बिकट नाही. मात्र, अजून कठोर निर्बंध लावून आपण लॉकडाऊन लावण्यापासून दूर राहू शकतो. त्यामुळेच निर्बंध कठोर करण्यात येतील. लसीकरणाचा कार्यक्रम योग्य पद्धतीनं सुरू आहे. मात्र, अजूनही काही लोकांमध्ये थोडा संभ्रम आहे. लसीकरणाबाबत घाबरुन न जाता डॉक्टरांना योग्य प्रतिसाद देण्याची गरज आहे', असंही लॉकडाऊनबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना शेख यांनी म्हटलं.



हेही वाचा -

कोरोनाची दुसरी लाट रोखायला हवी, पंतप्रधानांचे राज्यांना निर्देश

सरकारी ड्रेस कोडमध्ये बदल, जीन्स चालेल पण टी-शर्ट नाही


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा